भाजप संभाजी ब्रिगेड सोबत जाणार का? चंद्रकांत पाटलांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी निवडणूकीत भाजपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संभाजी ब्रिगेडकडून संयुक्तरित्या प्रकाशित होणाऱ्या मराठा मार्ग या मासिकात खेडेकर यांनी लिहिलेल्या लेखात ही भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यात आता भाजपला नवा मित्र मिळण्याची शक्यता आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं आता त्यांनी आपली भूमिका सांगितली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. पण आम्ही अद्याप कोणताही निर्णयापर्यंत आलेलो नाही. खेडेकरांची नेमकी ऑफर काय आहे ते पाहू. चर्चा करु, त्यानंतर याबाबतचा निर्णय घेऊ” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आमचा पक्ष हा जगभर पसरलेला आहे. देशात १२ राज्यात आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे इतक्या सहजपणे हे निर्णय होत नाहीत. त्याची मोठी प्रक्रिया असते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पुरुषोत्तम खेडेकर नेमकं काय म्हणाले-

पुरुषोत्तम खेडेकर यांनी आगामी निवडणुकीसाठी त्यांनी चक्क भाजपसोबत युती हाच पर्याय असल्याचं म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडली. त्यामुळे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड हे आता भाजपसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचं दिसून येतंय.

You might also like