अहो पाटील कोथरूडवर बोलू काही! ‘आप’ उमेदवार अभिजित मोरे यांचे चर्चेचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । पुण्यातील कोथरूड मतदार संघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार अभिजित मोरे यांनी भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांना कोथरूडच्या मुद्द्यांवर बोलण्याचे आवाहन केले आहे. कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर चर्चेसाठी येण्याचे आवाहन त्यांनी सोशल मीडिया व पत्रकारांच्या द्वारे केलं होतं.

या पत्रकात चंद्रकांत पाटील यांच्याकडून कोथरूडच्या संबंधित नसलेल्या मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे असे नमूद केले आहे. त्यामुळे कोथरूडकरांशी संबंधित असणाऱ्या मुद्यांवर चर्चा व्हावी. त्यासाठी मोरे यांनी पाटलांना चर्चेचे आवाहन केले होते.

मात्र चंद्रकांत पाटलांची प्रचार रॅली ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून गेली तरीही त्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे आता पुन्हा १८ तारखेला चंद्रकांत पाटील यांनी चर्चेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आपच्या वतीने करण्यात आलं आहे