व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

“मला उद्धव ठाकरेंची कुंडली पाहायची आहे, काय भाग्यवान माणूस आहे”; चंद्रकांत पाटील यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. अधिवेशन संपल्यानंतर आता भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये पुन्हा टीका टिप्पणी सुरु झाली आहे. दरम्यान आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टोलेबाजी केली आहे. “मला उद्धव ठाकरे यांची कुंडली पहायची आहे, काय भाग्यवान माणूस आहे. कशाचेही सोयर सुतक नाही, काही काम नाही, पण त्यांना कुणी हलवू शकत नाही, असा टोला पाटील यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले की, “सर्व आमदार काम घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे जातात. उद्या सामनामधून माझी खिल्ली उडवली जाईल. पण काळ तुम्हाला दाखवून देतील तुम्ही कुणाची खिल्ली उडवता. संजय राऊत यांच्याकडून माझी सारखी चेष्टा केली जाते पण ती अंगावर येणार आहे

आमची सत्ता असताना आहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाची उभारणी केली. होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण केला जाणार आहे. पण विरोधीपक्षनेते यांना देखील आमंत्रण नाही. शरद पवार येईपर्यंत जमावबंदी लावली आहे, त्यावेळी देखील जमावबंदी लावा ना अशी प्रतिक्रियाही सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या वादावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी दिली.