शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे की पवारांशी प्रेरित…; चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असणारे नवाब मलिक यांचे दाऊदच्या सहकाऱ्यांसोबत व्यावहारिक संबंध असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “हा देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाऊदशी ज्यांचा संबंध असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. तरीही त्यांचा राजीनामा घेतिला जात नाही. मग ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे की पवारांशी प्रेरित शिवसेना आहे, असेही पाटील यांनी म्हणते.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, आपल्या या महाराष्ट्रात जे चालले आहे त्या प्रक्राबद्दल हसावे कि रडावे हाच प्रश्न पडतो. कारण चार महिने झाले नवाब मलिकांनाअटक करून. ज्यावेळी त्यांना अटक केली तेव्हा सुरुवातीला त्यांची खाती काढून घ्यायला हवी होती. मात्र त्यासाठी खुद्द मुख्यमंत्री तयार नाहीत. नंतर लक्षात आले की खाती ठेवली तर फायली सहीला तुरुंगात पाठवायला लागतील. त्यामुळे नाईलाजाने खाती काढली.

अजून मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला घेतलेला नाही. आपल्याकडे असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरे किती तडजोडी करणार आहात? कधीतरी बंड करून उठा. बाळासाहेबांचा वारसा शिल्लक ठेवायचा आहे की नाही? की ते संग्रहालयात ठेवायचे आहेत?” असा खोचक सवाल देखील पाटील यांनी केला आहे.

कुणीतरी फेसबुकवर एक पोस्ट टाकली, तर त्यावर तातडीने १५-१६ जिल्ह्यात केसेस दाखल होतात त्याला अटक होते. जामीन मिळू दिला जात नाही. मग ज्यांचा हा देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाऊदशी संबंध असल्याचे न्यायालयाने म्हटल्यानंतरही राजीनामा घेणार नाही. मग ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे की पवारांशी प्रेरित शिवसेना आहे, असेही पाटील यांनी म्हणते.

Leave a Comment