“दाऊद बिचारा मुंबईत यायला घाबरतो…”, चंद्रकांत पाटील यांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यापासून राज्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाची चर्चा होत आहे. दरम्यान मुंबईतील अधिवेशनातही दाऊदचा मुद्दा उपस्थित करत मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. दरम्यान आज चंद्रकांत पाटील यांनी राज्यसरकार व दाऊद यांच्यावर निशाणा साधला. “20 दिवस झाले, एक कॅबिनेट मंत्री जेलमध्ये असतो आणि तुम्ही त्याचा राजीनामा घेत नाहीत. दाऊदचा दबाव असायला पाहिजे म्हणजे किती असायला पाहिजे. तो बिचारा घाबरतो इथे यायला आणि हे त्याला घाबरतायत”, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला आहे.

मुंबईत आज विधानभवनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. यावेळी पाटील म्हणाले की, ” महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येऊन २८ महिने झाले आहेत. या दिवसात तुम्ही फक्त धमक्याच देत आहात. 20 दिवस झाले, एक कॅबिनेट मंत्री जेलमध्ये असतो आणि तुम्ही त्याचा राजीनामा घेत नाहीत.

सरकारी नोकराला अटक झाली, की 24 तासांत निलंबित करावं लागतं असा नियम आहे. तुम्ही त्याच्यावर जात आहात का? याउलट पाहिले तर न टिकणाऱ्या केसेस आमच्या पक्षातील प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर लावायच्या. पण जी कोर्टात टिकली आहे, त्यांचा राजीनामा घ्यायचा नाही. दाऊदचा दबाव असायला पाहिजे म्हणजे किती असायला पाहिजे, असे पाटील यांनी म्हंटले.

Leave a Comment