…म्हणून मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले नाहीत; चंद्रकांतदादांनी सांगितले खरं कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचा दौरा करत तेथील परिस्थितीची पाहणी केली आणि गुजरातला हजार कोटींची आर्थिक घोषणा केली. यावरून राज्यातील ठाकरे सरकारने मोदींना लक्ष केलं होतं. मोदींनी महाराष्ट्राचा दौरा का केला नाही असा प्रश्न उपस्थित होत असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मागील कारण सांगितलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मी मुंबईत असताना तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र प्रवास ठरला, पण हवामान खात्याने त्यांना प्रामुख्याने हवाई प्रवास करताना अजुनही महाराष्ट्रातील सागरी पट्ट्यात ते सोयीचं नाही अशाप्रकारची सूचना केली. म्हणून ते गुजरातला गेले पण गुजरातमध्ये जाऊन, संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत घोषित केली.

तसेच गोवा, महाराष्ट्र सारख्या राज्यांना सूचना केल्या की तुम्ही ताबडतोब पंचनामे करा, सर्वे करा आणि तुम्ही प्रस्ताव सादर करा, मी मदत देईन. असे मोदी म्हणल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. गुजरातसाठी नावाचं वेगळं पॅकेज त्यांनी घोषित केलं नाही. दोन लाख रूपये मृतांच्या नातेवाईकांना संपूर्ण देशभरासाठी त्यांनी घोषित केले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment