“आम्हीपण कच्च्या गुरुचे चेले नाहीत”; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. या प्रकरणावरून आज महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी मुंबईत मंत्रालय परिसरात धरणे आंदोलन करीत निषेध नोंदवला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर अनेक आरोप केले. या आरोपावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आम्हीही काही कच्च्या गुरुचे चेले नाही, आम्हाला २७ महिने त्रास दिला आहे,” असे पाटील यांनी म्हंटले.

सध्या टीकेत असलेल्या नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास राष्ट्रवादीने नकार दिला आहे. त्याच्य निषेधार्थ आज भाजपच्यावतीनेही आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले की, 1993 च्या समितीची अहवाल का झाकलाय? तो अहवाल जाहीर झाला तर भल्या भल्यांना जेलमध्ये जावे लागेल. नवाब मलिक यांची चिठ्ठी उद्धव ठाकरे यांनी उचलली. कोण कुणाला शह काटशह देत आहे. पुन्हा उद्धव ठाकरे यांना रडारवर आणण्याचं काम सुरु झाले आहे.

संजय राऊत हे शरद पवारांशी एकनिष्ठ आहेत. उद्धव ठाकरेंचे आसन डळमळीत आणण्याचं काम सुरु आहे. यांच्या अशा कामांमुळे हे सरकार टिकणार नाही. राज्य तुमच्याकडे आहे आणि गृहमंत्री हि तुमचाच आहे. मागा आणा निदर्शनास, असेही यावेळी पाटील यांनी म्हंटले.