हीच ती वेळ मुख्यमंत्र्याची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवण्याची – चंद्रकांत पाटील 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधानांच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिल्याने केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. यावर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री म्हणजे उठणे, जाणे, भेटणे, चर्चा करणे, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे असं आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी खरंच दुसऱ्याकडे देण्याची ही वेळ आहे,” अशी टीका चंद्रकांत पाटलांनी करीत राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. आज कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे आमचे मित्र आहेत. पण शत्रू जरी असला तरी त्याच्या तब्यतीबद्दल आपण त्याला शुभेच्छा देतो. त्यामुळे तो विषय नाही, विषय वारंवार असा चाललेला आहे की, जर मुख्यमंत्र्यांची अशी तब्यतीची स्थिती असेल तर त्यांनी कोणाला तरी चार्ज दिला पाहिजे. याच कारण मुख्यमंत्री हे महाराष्ट्रासारख्या 12 कोटी जनता असणाऱ्या राज्याचे असतात. कालची बैठक ही अत्यंत महत्वपूर्ण होती. या पंतप्रधानांच्या बैठकीला तुम्ही टोपे, दिलीप वळसेंना पाठवले.

देशात इतरही राज्य आहेत. त्या राज्यातही मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधानांच्या बैठकीला सर्व राज्याचे मुख्यमंत्री असल्याने आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना बोलायला वाव मिळणार नाहीच. पण तेच जर तुम्ही असता तर तुम्ही केवळ मुख्यमंत्री नाहीत, तर तुमचे खूप जवळचे संबंध देखील आहेत. महत्वपूर्ण निर्णय करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष उपलब्ध नाहीत. घरी बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करतो वैगरे हे पुरत नसल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबद्दल एक महत्वाचे वक्तव्य केले. ते म्हणाले की, मुंबै बँकेचे अध्यक्षपद मिळवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले. पण शिवसेनेचा उमेदवार उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडला. कसं झालं हे? आता हे शिवसेनेला कळत नाही की, तुम्हाला पूर्णपणे संपवण्याचा एक प्लॅन चालला आहे आणि त्या प्लॅनमध्ये तुम्ही फसत चालला आहे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

You might also like