चंद्रपूर | विदर्भात मुसळधार पावसामुळे नद्यांनी रौद्ररुप धारन केले आहे. सततच्या पावसाने अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्मान झाली असून जणजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भातील वर्धा, इराई, इंद्रावती या नद्यांना पूर आला आहे. इंद्रावती नदीला पूर आल्याने गडचिरोली जिल्ह्यातील बऱ्याच गावांशी संपर्क तुटला आहे. विदर्भातील नद्यांच्या काठची बरीच जनावरे वाहून गेल्याचे समजत आहे. एका मेंढपाळाच्या १ हजार ८९ शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.
चंद्रपूर शहरात इराई नदीचे पाणी शिरल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील झोपडपट्टी इलाख्यात पाणी शिरल्याने लोकांचे हाल होत आहेत. प्रशासनाने प्राथमिक स्तरावर उपाय योजना केल्या आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास चंद्रपूर शहरात नागरिकांच्या समस्यात वाढ होण्याची शक्यता आहे.