“वसुली न करणे हे पाप असेल तर ती चूक मी पुन्हा करेन, माझी तत्काळ चौकशी करा” : चंद्रशेखर बावनकुळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्याच्या काळात महावितरण कंपनीने राज्यभरात अनेक प्रकल्प उभारले होते. त्या प्रकल्पाची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यासाठी कंपनीच्या तीन सदस्यांची समिती नेमली असून एका महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी प्रतिक्रिया दिली. “वसुली न करणे हे ‘पपा असेल तर ती चूक मी करेन, माझी चौकशी करा, असे म्हणत ऊर्जामंत्री खात्याचा मंत्री कधीच ऊर्जा कंपनीत जात नाही, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला या आघाडी सरकारचे हेच कळत नाही कि ते अडीच वर्ष का शांत बसले. त्यावेळी कारवाई आणि चौकशी का केली नाही. चौकशी समितीमध्ये पाहिले तर सरकारने एक संचालकांना चौकशी करण्याचे अधिकार त्यावेळी दिले. अशा प्रकारच्या कंपन्यांवर चौकशी करायची असेल तर त्रयस्थ समितीची स्थापना करून त्याच्या मार्फत चौकशी केली पाहिजे. मी ऊर्जा मंत्र्याना पत्र लिहले आहार. आणि वाटेल ती त्रयस्थ यंत्रणा नेमावी, महिनाभरात चौकशी करून बारा कोटी जनतेला रिपोर्ट कळू द्यावा.

ज्या सरकारच्या काळात लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र झाला. ज्या सरकारच्या काळात सौर कृषी वाहिनी योजना आली. ज्या सरकारच्या काळात साडेसात लाख शेतकर्याना वीज कनेक्शन दिले गेले. इतके चांगले काम झाल्यावर आता आपले फेलोव्हर आहे. त्यामुळे आता इंटर्नल रिपोर्ट तयार करायचा. त्याच्यातून सोळा शहराला खासगीकरणात नेण्याचा डाव हा सरकारकडून केला जात आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला.