मुंबई म्हणजे राज्याचा आर्थिक केंद्रबिंदू. मुंबईत खूप मोठ्या घडामोडी घडत असतात. रोज नवनवीन कार्यक्रम आखले जातात. सद्या मुंबईत “ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ ‘ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या उद्भवू नये याकरिता मुंबई वाहतूक विभागाकडून एक महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया…
ग्लोबल फिनटेक 2024 हा हाय प्रोफाईल कार्यक्रम जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर मध्ये आयोजित केला आहे. त्यामुळे 30 ऑगस्ट पर्यंत या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. म्हणूनच परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. त्यामुळे 30 ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत बीकेसी मध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी या भागातून जाणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यास वेळ लागेल प्रवाशांनी विलंब टाळण्यासाठी या तासांमध्ये बीकेसी मार्गावरून प्रवास करू नये अशी माहिती वाहतूक पोलिसांच्या कडून देण्यात आली आहे.
काय आहेत पर्यायी मार्ग?
28 ते 30 ऑगस्ट या कालावधीमध्ये जिओ वर्ल्ड कॉन्वेंशन सेंटर बीकेसी इथे आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमामुळे बीकेसी मध्ये सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा अपेक्षित आहे. असे वाहतूक पोलिसांनी सांगितले तसेच प्रवाशांनी बीकेसी मार्ग टाळून जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, सांताक्रुज चेंबूर लिंक रोड आणि ईस्टरन फ्री वे यासारखे पर्याय मार्ग वापरावेत असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नक्की काय आहे ग्लोबल फिनटेक फेस्ट
ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 ही पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्वर्जन कौन्सिल यांच्याद्वारे दरवर्षी आयोजित केली जाणारी सर्वात मोठी परिषद आहे. पाचवा ग्लोबल फिन्टेक्स 28 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये बीकेसी येथे होत आहे. ग्लोबल फिनटेक्स 2024 इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय परराष्ट्र मंत्रालय वित्तीय सेवा विभाग रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण यांच्याद्वारे सादर केला जाणार आहे.