कराड | दिवाळी सणानिमित्त कराड शहरात गुरुवार 4 नोव्हेंबर ते रविवार 7 नोव्हेंबर या काळात कराड शहरातील सकाळी सोडण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा वेळेत बदल करण्यात आला असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
सोमवार पेठ पाण्याच्या टाकीतून सकाळी 5:30 ते 6:30 तर सूर्यवंशी मळा पाण्याच्या टाकीतून नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा होणार आहे. रुक्मिणीनगर येथील पाण्याच्या टाकीतून सकाळी 6 ते 7 या वेळेत तर गजानन हौसिंग सोसायटी मधील पाण्याच्या टाकीतून सकाळी नेहमीप्रमाणे व सायंकाळी 7 वाजता तसेच 4 ते 7 या वेळेत पाणी पुरवठा पाणी होणार आहे.
रविवार पेठ पाण्याच्या टाकीतून सकाळी 6 ते 7 या वेळेत तर टाऊन हॉल पाण्याच्या टाकीतून सकाळी 6 ते 7 या वेळेत तर मार्केट यार्ड पाण्याच्या टाकीतून नेहमीप्रमाणे पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे, तसेच शनिवार 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळचा पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे करण्यात येणार असून सोमवार 8 नोव्हेंबर पासून कराड शहरातील पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे करण्यात येणार आहे.