फक्त एका चुकीमुळे तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं; त्वरित मोबाईलमधल्या बदला या सेटिंग्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज कालच्या जगात मोबाईल हॅक करून, ओटीपीच्या माध्यमातून कोणत्याही एका व्यक्तीच्या खात्यावरून पैसे काढणे सोयीचे झाले आहे. त्यामुळेच अनेक हॅकर्स या नव्या ट्रिक्स वापरून समोरच्या व्यक्तीकडून पैसे लुबाडतात. अशा अनेक कारणांमुळे आपल्याकडे असलेला असलेला स्मार्टफोन व्यवस्थितरित्या वापरणे गरजेचे आहे. सर्वात प्रथम या स्मार्टफोनमध्ये काही महत्त्वाच्या सेटिंग्स करण्याची आवश्यकता आहे. या सेटिंग्स नेमक्या कोणत्या असाव्यात आपण जाणून घेऊयात.

Location

आपल्या स्मार्टफोनमध्ये लोकेशन नावाचा एक पर्याय दिलेला असतो. अनेकवेळा एखाद्या ॲप उघडताना आपल्याला हा पर्याय वापरावा लागतो. परंतु लोकेशन पर्याय निवडताना आपल्याला इतर बाबींची काळजी घेण्याची देखील गरज आहे. या लोकेशन ॲप मुळे एखादी व्यक्ती तुमच्या स्मार्टफोनमधील सर्व माहिती जाणून घेऊ शकते. तसेच तुमचा फोन देखील हॅक करू शकते. त्यामुळे कधीही लोकेशन नेमके कोणत्या कारणासाठी मागत आहेत हे तपासावे.

Trackers बंद करणे

आपण सतत नवनवीन ॲप्स आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करत असतो. हे ॲप ओपन करताना आपल्याला ट्रॅकरची परवानगी मागितली जाते. ही परवानगी देताना आपण सावधगिरी बाळगायला हवी. ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीसाठी परवानगी देतो, तेव्हा आपल्या फोनमधील डाटा देखील समोरच्या व्यक्तीला पोहोचतो. त्यामुळे कधीही एखादी परवानगी देताना त्याचा हेतू तपासावा.

VPN Apps

आपल्या फोनवर अनेकवेळा वेगवेगळ्या ॲप्स डाऊनलोड करा असे संदेश येत असतात. यात VPN Apps डाऊनलोड करा असे सांगितले जाते. या ॲपच्या माध्यमातून हॅकर्स तुमचा फोन हॅक करू शकतात. तसेच तुमच्या फोनमधील माहिती मिळवून त्याचा गैरवापर करू शकतात.

OPT देणं टाळा

आज काल ओटीपीमुळे अनेक गोष्टी सहज सोप्या पद्धतीने करणे शक्य झाले आहे. गुगल पे असो फोन पे असो किंवा एखादा फॉर्म भरायचा असतो ओटीपी हा लागतो. परंतु अनेक वेळा या ओटीपीमुळे आपले खाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे ओटीपी नक्की कोणत्या कारणासाठी लागत आहे त्याची आवश्यकता आहे का हे सर्वात प्रथम पहावे.