मिटवामिटवी अंगलट : सरपंच, तंटामुक्त समितीच्या अध्यक्षासह 5 प्रतिष्ठित व्यक्तींवर गुन्हा दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | जावळी तालुक्यातील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने एकाने लैंगिक शोषण (अत्याचार) केले होते. या घटनेत पीडित कुटुंबियांना 25 हजार रुपयांचे आमिष देऊन गावात प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरपंच, तंटामुक्ती अध्यक्षासह 5 जणांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश ज्ञानेश्वर पवार, प्रमोद कृष्णा कांबळे, केशव तुकाराम महामुलक, अशोक ऊर्फ आनंदा निवृत्ती महामुलकर, दिलीप दिनकर महामुलकर अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. या घटनेतील मुख्य संशयित आरोपी बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय – 65, रा. नेवेकरवाडी, ता.जावळी) यास दोन दिवसापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीवर दोन वेळा (अत्याचार) असे प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी स्थानिक पातळीवर संबंधित आरोपीला समज देखील देण्यात आली होती. मात्र, ज्यावेळी आरोपी बबलिंग सपकाळ याने विकृतीचा कळस गाठला. आरोपीच्या केलेला कृत्यास पाठीशी घालत 25 हजार रुपये आमिष दाखवत संबंधित पीडित कुटुंबीयांना तक्रार मागे घेण्यास गावातील लोक दबाव टाकत होते. दरम्यान या प्रकरणाची केस मागे घेण्यासाठी 5 जण मेढा पोलीस ठाण्यामध्ये आले होते.

या घटनेत पीडितावर झालेल्या अत्याचाराला महत्व न देता आरोपीस वाचवण्यासाठी पुढे आलेल्या राजकीय प्रतिष्ठित 5 व्यक्तींना मेढा पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. जावळी तालुक्यात गेल्या सहा महिन्यात तीन वेळा अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल खराडे यांनी भेट दिली असून सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल माने अधिक तपास करीत आहे.

Leave a Comment