Tuesday, January 7, 2025

Chatgpt ने निवडली शतकातील सर्वोत्कृष्ट Test XI; ‘या’ दिग्गजांचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणारे ओपनएआयचे चॅटजीपीटी आता अँड्रॉइड फोनमध्ये ॲपच्याद्वारे वापरता येणार आहे. कारण की, नुकतेच भारतात चॅटजीपीटीच्या ॲपचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या चॅटजीपीटीकडून क्रिकेट क्षेत्रात नाव जमवलेल्या आणि आपल्या कामगिरीतून सर्वांना चक्कीत केलेल्या 21 व्या शतकातील सर्वोत्कृष्ट 11 क्रिकेटपटूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी अनेक खेळाडूंनी आपलॆ ऑल टाइम बेस्ट XI निवडली आहे. आता Chatgpt ने २१ व्या शतकातील सर्वोत्कृष्ट Test XI निवडली असून यामध्ये क्रिकेट मधील अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

पहा कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश –

Chatgpt ने निवडलेल्या संघात क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रूपाने एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश आहे. त्याचबरोबर, इंग्लंडचा सलामीवीर खेळाडू अ‍ॅलास्टेर कूकचा देखील यामध्ये समावेश आहे. मधल्या फळीत दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिसला घेण्यात आलं आहे.

या सर्वांबरोबरच श्रीलंकेचा कुमार संघकारा, ऑस्ट्रेलियाचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट यांचा देखील या यादीत समावेश करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे,ऑस्ट्रेलियाचा सर्वात सुप्रसिद्ध खेळाडू शेन वॉर्न याचा एकमेव फिरकीपटू म्हणून समावेश करण्यात आला आहे. Chatgpt ने आपल्या ऑल टाइम XI मध्ये ३ जलदगती गोलंदाजांचा समावेश केला आहे, यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन, इंग्लंडचा जिमी अँडरसन आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्राथचा समावेश आहे. Chatgpt ने निवडलेली ही टीम अतिशय संतुलित दिसत आहे. या सर्वच खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीत उत्कृष्ट अशी क्रिकेट क्षेत्रात उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे.

दरम्यान, ओपनएआय (OpenAI) चे चॅटजीपीटी ॲप भारतात लॉन्च करण्यात आले असून ते आता अँड्रॉइड फोनमध्ये वापरण्यात येणार आहे. कंपनीने सुरुवातीला चॅटजीपीटी ॲप यूएस, भारत, बांगलादेश आणि ब्राझीलमधील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. इथून पुढे चॅटजीपीटी ॲप आपण सहज प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून अँड्रॉइड फोनमध्ये वापरू शकतो