हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बँकेकडून गृहकर्ज घेऊन घर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) एक आनंदवार्ता दिली आहे. नुकतीच SBI बँकेने आपल्या काही कर्जांवरील व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे, गृहकर्ज, कारकर्ज आणि व्यावसायिक कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गृहकर्जासाठी नवीन दर
SBI ने गृहकर्जाचे दर 8.25% ते 9.2% पर्यंत निश्चित केले आहेत. जे क्रेडिट स्कोअरनुसार ठरतील. तसेच, मॅक्सगेन ओव्हरड्राफ्ट होम लोन हा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांसाठी 8.45% ते 9.4% इतका दर लागू केला आहे.
जर कोणी आधी घेतलेल्या गृहकर्जावर अतिरिक्त रक्कम घेऊ इच्छित असेल, तर टॉप-अप लोनसाठी 8.55% ते 11.05% व्याजदर ठेवण्यात आला आहे. याशिवाय, टॉप-अप ओव्हरड्राफ्ट लोन साठी व्याजदर 8.75% ते 9.7% दरम्यान असेल.
वरिष्ठ नागरिकांसाठी रिव्हर्स मॉर्गेज लोन 11.3% या दराने दिले जाणार आहे, तर योनो अॅपद्वारे घेता येणाऱ्या योनो इंस्टा होम टॉप-अप लोनसाठी 9.1% दर निश्चित करण्यात आला आहे.
वाहन कर्जासाठी आकर्षक ऑफर
SBI कडून ऑटो लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठीही दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता, स्टँडर्ड कार लोन, NRI कार लोन, आणि एश्योर्ड कार लोन 9.2% ते 10.15% या दरम्यान उपलब्ध असतील.
महत्वाचे म्हणजे, इलेक्ट्रिक वाहनांसाठी ग्रीन कार लोन योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी 9.1% ते 10.15% दर निश्चित करण्यात आला आहे. ही योजना पर्यावरणपूरक वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आहे. तसेच, टू-व्हीलर लोन 13.35% ते 14.85% दरम्यान असेल. परंतु इलेक्ट्रिक दुचाकीसाठी 0.5% व्याजदर सवलत असणार आहे.
दरम्यान, SBI कडून गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजदर कपात झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बँकेने हे दर एक्सटर्नल बेंचमार्क रेट (EBR) वर आधारित निश्चित केले आहे. सध्या RBI चा रेपो दर 6.25% आहे. जर ठेवींवरील व्याजदर आणखी कमी झाले, तर भविष्यात कर्जाचे दर अजूनही कमी होण्याची शक्यता आहे.




