Cheapest CNG Cars : किंमत कमी, मायलेज जास्त; स्वस्तात खरेदी करा या CNG कार

Cheapest CNG Cars
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Cheapest CNG Cars भारतीय ऑटोमोबाईल बाजारात CNG गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीपासून सुटका मिळवण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने CNG कार खरेदी करत आहेत. ग्राहकांची वाढती मागणी पाहून अनेक कार उत्पादन कंपन्या आपल्या गाड्या CNG व्हर्जन मध्ये लाँच करत आहेत. तुम्हीही नवी CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा ५ CNG गाड्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांची किंमत कमी आहे, पण मायलेज मात्र जास्त आहे. या कार कोणत्या आहेत तेच सविस्तर पाहुयात.

१) Maruti Suzuki Swift CNG

Maruti Suzuki Swift हि कार देशातील सर्वत लोकप्रिय आणि खास करून मध्यमवर्गीयांना हवीहवीशी अशी कार.. लोकांची वाढती मागणी पाहूनच कंपनीचे स्विफ्ट कार CNG मोड मध्ये लाँच केली. मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजीमध्ये १.२ लिटर इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सला जोडण्यात आलं असून ते ६९.७५ पीएस पॉवर आणि १०१.८ एनएम टॉर्क जनरेट करते. CNG मोड मध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट ३३ किमी/किलो मायलेज देते. या कार मध्ये ६ एअरबॅग्ज, ३ पॉइंट सीट बेल्ट, हिल होल्ड कंट्रोल, ESC, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम यांसारखे अनेक सिक्युरिटी फीचर्स आहेत. बाजारात मारुती सुझुकी स्विफ्ट CNG ची किंमत ८.१९ लाख रुपयांपासून सुरू होते.

२) Maruti Alto K10 (CNG)– Cheapest CNG Cars

Maruti Alto K10 हि सध्याच्या मार्केट मधील बेस्ट CNG कार (Cheapest CNG Cars) मानली जाते. दैनंदिन वापराव्यतिरिक्त, तुम्ही लांब प्रवासासाठी सुद्धा Maruti Alto K10 CNG वापरू शकता. लहान कुटुंबासाठी ही एक परिपूर्ण कार म्हणता येईल. या कार मध्ये ४ प्रवासी आरामात बसु शकतात. परंतु त्यातील सीट्स आरामदायी नसल्याने लांबचा प्रवास करताना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो. हि कार पेट्रोल+ CNG अशा दोन्हीवर चालते. CNG मोड मध्ये मारुतीची अल्टो तब्बल ३३.८५ किमी मायलेज देते. भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये Maruti Alto K10 ची एक्स-शोरूम किंमत ५.८९ लाख रुपयांपासून सुरू होते.

३) Tata Tiago iCNG

Tata Tiago iCNG मध्ये १.२ लिटर इंजिन देण्यात आलं आहे जे सीएनजी मोडमध्ये ७३ एचपी पॉवर आणि ९५ एनएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्सला जोडण्यात आलं आहे. Tata Tiago iCNG हि कार सीएनजी मोडवर २७ किमी/किलो मायलेज देते असं बोललं जाते. मारुतीच्या सीएनजी कारच्या तुलनेत या कारचे मायलेज कमी असलं तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने हि कार ग्राहकांसाठी बेस्ट पर्याय आहे. मार्केट मध्ये Tata Tiago iCNG ची किंमत ५.६५ लाख रुपयांपासून सुरू होते. Cheapest CNG Cars

४) Maruti Suzuki Celerio CNG

Maruti Suzuki Celerio CNG ही एक उत्तम सीएनजी कार आहे. या गाडीची रचना एकदम मस्त करण्यात आली असुन यामध्ये ५ लोक आरामात बसू शकतात. यामध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिनयेते, जे पेट्रोलवर 67 पीएस पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करते तर सीएनजीवरील पॉवर आउटपुट 56.7पीएस/82 एनएम आहे, जे नियमित पेट्रोल व्हर्जनपेक्षा 8.5पीएस/7एनएम कमी आहे. शहरी भागात गाडीचे इंजिन आणखी चांगलं परफॉर्मन्स देते. सुरक्षिततेसाठी या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD आणि एअरबॅग्जची सुविधा आहे. महत्वाची बाब म्हणजे ही कार सीएनजी मोडवर ३४.४३ किमी/किलो मायलेज देते. बाजारात सेलेरियो सीएनजीची एक्स-शोरूम किंमत ६.८९ लाख रुपयांपासून सुरु होते.

५) Hyundai Exter CNG

Hyundai Exter CNG ची किंमत ८.५० लाख रुपयांपासून सुरू होते. हि किंमत इतर CNG कारच्या तुलनेत जास्त असली तरी त्याप्रमाणे दमदार फीचर्स सुद्धा यामध्ये देण्यात आले आहेत. कार मध्ये डबल सीएनजी टँक आहेत ज्यामुळे त्याच्या बूटमध्येही पुरेशी जागा आहे. एक्स्टर सीएनजी ड्युअल सिलेंडरमध्ये १.२ लिटर बाय-फ्यूल (पेट्रोल+सीएनजी) इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन ५ स्पीड गिअरबॉक्सला जोडण्यात आलं असून ६९ पीएस पॉवर आणि ९५.२ एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये सनरूफ, एलईडी डीआरएल, एलईडी टेल लॅम्प, ऑटोमॅटिक तापमान नियंत्रण, ६ एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, हिल स्टार्ट नियंत्रण सारखे अनेक फीचर्स मिळतात. जागेची अजिबात कमतरता नसल्याने तुम्ही या कार मधून अगदी आरामात प्रवास करू शकता.