Cheapest Electric Car : सर्वात स्वस्त Electric Car लॉन्च; 2 हजार रुपयांत करा बुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या (Cheapest Electric Car) किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. त्यामुळे सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईस्थित स्टार्टअप पर्सनल मोबिलिटी व्हेईकलने आपली देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक मायक्रो कार PMV EaS-E लॉन्च केली आहे. या गाडीची किंमत फक्त 4.79 लाख रुपये आहे.

फीचर्स –

PMV EaS-E ही देशातील (Cheapest Electric Car) सर्वात लहान इलेक्ट्रिक कार आहे. या कारमध्ये दोन व्यक्ती बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून यामध्ये एक व्यक्ती समोर तर दुसरी व्यक्ती मागे बसेल. या इलेक्ट्रिक कारची लांबी 2,915 मिमी, रुंदी 1,157 मिमी आणि उंची 1,600 मिमी आहे. गाडीचा व्हीलबेस 2,087 मिमी असून ग्राउंड क्लीयरन्स 170 मिमी आहे.

Cheapest Electric Car

या कारमध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट, डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टीम, एअर कंडिशनिंग, रिमोट पार्क असिस्ट, रिमोट कीलेस एंट्री, क्रूझ कंट्रोल ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, फीट-फ्री ड्रायव्हिंग, ऑनबोर्ड नेव्हिगेशन, म्युझिक इत्यादी अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

Cheapest Electric Car

120 ते 200 किमी रेंज –

ही इलेक्ट्रिक कार तीन वेगवेगळ्या बॅटरी (Cheapest Electric Car) पर्यायांसह लॉन्च करण्यात आली आहे. एका चार्जवर ही गाडी 120 ते 200 किलोमीटर अंतर पार करू शकते . बॅटरी चार्जिंगच्या वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, या कारची बॅटरी फुल्ल चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास लागतात. ही कार कोणत्याही 15A आउटलेटद्वारे चार्ज केली जाऊ शकते. कंपनीकडून या कारसोबत 3 kW चा AC चार्जर दिला जात आहे. कारचे टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे आणि फक्त 5 सेकंदात ही गाडी 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडू शकते.

Cheapest Electric Car

किंमत – (Cheapest Electric Car)

गाडीच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, देशातील या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत 4.79 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने सध्या प्रास्ताविक किंमतीसह ही कार लॉन्च केली आहे जी फक्त पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी आहे. कंपनीने या कारची प्री-बुकिंग आधीच सुरू केली होती, जी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून फक्त 2,000 रुपयांमध्ये बुक केली जाऊ शकते.

हे पण वाचा :

Maruti Suzuki Baleno Delta CNG : मारुतीची ही CNG कार बाजारात घालणार धुमाकूळ; 31 किमीचे मायलेज

1 लिटर पेट्रोलमध्ये 40Km धावणार! Maruti Swift आणि Dzire हायब्रिड इंजिनसह लवकर होणार लाँच

Alto K10 vs Alto 800 : मारुती Alto K10 vs Alto 800; कोणती कार आहे बेस्ट?

Honda Car : Honda च्या या गाड्यांवर 63,000 रुपयांपर्यंत बंपर सूट; तुम्हीही घ्या फायदा