Honda Car : Honda च्या ‘या’ गाड्यांवर 63,000 रुपयांपर्यंत बंपर सूट; तुम्हीही घ्या फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Honda कंपनीच्या (Honda Car) गाड्या खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल तर या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत तुम्ही 63,000 रुपयांपर्यंत सूट घेऊन कार खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही Honda चे Amaze, City (4th-5th Generation), WR-V आणि Jazz मॉडेल्स तुमच्या घरी आणू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशिपलाही भेट देऊ शकता. चालला जाणून घेऊया कोणत्या गाडीवर किती रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

Honda Amaze

Honda Amaze- (Honda Car)

Honda ची कॉम्पॅक्ट सेडान Honda Amaze या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत खरेदी केल्यास तुम्हाला एकूण 19,896 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो . या ऑफरमध्ये, कंपनी या महिन्यात 10000 रुपयांपर्यंतची रोख सूट किंवा 11,896 रुपयांचा FOC अॅक्सेसरीजचा लाभ देत आहे. 5000 रुपयांचा ग्राहक लॉयल्टी बोनस असेल आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूटही दिली जात आहे. या (Honda Car) कारची एक्स-शोरूम किंमत 6,62,600 आहे.

Honda Jazz

Honda Jazz –

कंपनी Honda Cars च्या हॅचबॅक Honda Jazz वर ​​या (Honda Car) महिन्यात एकूण रु. 25,000 सूट देत आहे. यामध्ये कार एक्सचेंजवर 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय 5,000 रुपये ग्राहक लॉयल्टी बोनस, 7,000 रुपये कार एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट मिळेल.

Honda सेडान

Honda सेडान-

Car India आपल्या सर्वाधिक विकल्या (Honda Car) जाणार्‍या सेडान सिटीवर रु.60,000 पर्यंत सूट देत आहे. यामध्ये 5,000 रुपयांचे कॉर्पोरेट फायदे तसेच 30,000 रुपयांपर्यंत रोख सूट मिळू शकते. तुमच्या जुन्या कारच्या बदल्यात रु. 10,000 च्या सवलतीसह 7,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस देखील आहे.

Honda WR-V

Honda WR-V-

Honda ची मध्यम आकाराची कॉम्पॅक्ट SUV Honda WR-V (पेट्रोल) या कारवर एकूण 63,144 रुपयांचा फायदा मिळत आहे. यामध्ये 30,000 रुपयांपर्यंत रोख सूट किंवा 36,144 रुपयांच्या FOC अॅक्सेसरीजवर ऑफर केली जात आहे. याशिवाय कार एक्सचेंजवर 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच 5000 रुपये ग्राहक लॉयल्टी बोनस, 7000 रुपये कार एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट ऑफर केले जात आहेत.

हे पण वाचा:

Maruti Suzuki Cars : Maruti Suzuki च्या या गाड्यांवर बंपर डिस्काउंट; तुम्हीही घ्या फायदा

Maruti Ertiga CNG : Maruti Suzuki च्या या CNG कारला ग्राहकांची मोठी मागणी; खास कारण काय?

TATAची ही कार 1100 रुपयांत धावणार 1 हजार किमी; उद्यापासून बुकिंग सुरु

Tata Blackbird SUV : Tata Motors लॉन्च करणार ब्लॅकबर्ड SUV; Hyundai Creta ला देणार थेट टक्कर