रेल्वे तिकिटाच्या किमतीत करा विमान प्रवास! ‘ही’ वेबसाइट देत आहे Ticket

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – तुम्ही जर ख्रिसमस आणि नवीन वर्षात कोठे फिरायला जायची तयारी करत असाल तर तुम्हाला एक जबरदस्त ऑफर देण्यात येतेय. खरं तर तुम्ही अगदी स्वस्तात हवाई प्रवास करायचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. असे का आहे कारण तुम्ही रेल्वेच्या तिकिटात (Ticket) विमानाचा प्रवास कराल आणि खिशावर ताण नाही येणार. पण तुम्ही सणवार अथवा नववर्ष दरम्यान प्रवास करता तर जास्तीचे पैसे मोजावे लागतात. परंतु आता तसे नाही होणार.

कुठे मिळतेय ही जबरदस्त ऑफर
आता online shopping साठी प्रसिद्ध असलेल्या Flipkart वरून लोक कपडे, स्मार्टफोनबरोबर अप्लायन्सेजच्या शॉपिंगसह विमानाचे तिकीट (Ticket) पण बुक करू शकतात. सध्या ख्रिसमस व नवीन वर्षाची धूम (सीझन ) चालू आहे. त्यामुळे कंपनी ग्राहकांना खूष करण्यासाठी विमान प्रवासावर सूट देत आहे. यामुळे ग्राहकांना कमी खर्चात विमान प्रवासाची संधी मिळाली आहे.

किती आहे ऑफर
तुम्ही व्यवस्थितपणे रेल्वेचे चांगल्या क्लासचे तिकीट बुक करत आहात तर तुम्हाला 2000 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंत खर्च द्यावा लागतो. ही किंमत आणखी जास्त पण होऊ शकते. ती रेल्वेवर अवलंबून असते. याच पैशातून विमान तिकीट (Ticket) बुक केले तर तुमच्यासाठी फायद्याची डील होऊ शकते. Flipkart आपल्या ग्राहकांना ही सवलत देत आहे. ग्राहकांना फक्त ठराविक मार्गावरच ही तिकीट बुकिंगची संधी दिली जाणार आहे.

आज आम्ही त्या मार्गाबाबत सांगणार आहोत. 25 डिसेंबरला Flipkart कडून एअर एशियाची दिल्ली ते लखनऊचे तिकीट बुक करत आहात तर फक्त 3017 रुपये द्यावे लागतील. त्याच दिवशी लखनऊ ते दिल्ली तिकीट (Ticket) बुक करणार आहात तर 3400 रुपयेच चुकवावे लागतील. ही किंमत खूपच कमी आहे. ही ग्राहकांसाठी फायद्याची ठरणार आहे. अशाच काही विमान मार्गावर तिकीट अगदी कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या