बीव्हीजीच्या हणमंत गायकवाड यांना १६ कोटींना फसवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | भारत विकास ग्रुपचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती हणमंत गायकवाड यांना १६ कोटी रुपयांना फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला आहे. आकर्षक परतावा मिळवण्यासाठी त्यांनी पैशांची गुंतवणूक केली होती. सावा मेडिको लिमिटेड कंपनी, बायोडिल लँबोरेटिज लिमिटेड, अनघा फार्मा या संस्थामध्ये त्यांनी गुंतवणूक केली होती. त्यात त्यांना गंडा घातला गेला आहे.

तुम्हाला आकर्षक परतावा मिळवून देतो म्हणून एका दांपत्याने हणमंत गायकवाड यांना साखर बोलत अडकवण्यात आले. त्यांना अधिकचा नफा मिळवून देतो असे सांगण्यात आल्यानेच त्यांनी या गुंतवणुकीत पैसा गुंतवण्याचा विचार एका आणि त्यांची फसवणूक झाली. पिंपरीमध्येच राहणाऱ्या विनोद जाधव आणि त्यांची पत्नी सुवर्णा जाधव यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर फळ विकणारा मुलगा ते कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या उद्योगाची उभारणी असा हणमंतराव गायकवाड यांचा नावलौकीक आहे. त्यांची ‘बीव्हीजी’ ही कंपनी देशातील अनेक संस्था आणि कंपन्यांना व्यवस्थापन, हाऊसकिपिंग आणि गार्डनिंग अशा सेवा पुरविते. अशा बड्या उद्योगपतीची देखील फसवणूक होऊ शकते यावर लोकांचा विश्वास बसत नाही. मात्र हि बाब खरी आहे कि गायकवाडांची फसवणूक झाली आहे.

Leave a Comment