औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाटयाने वाढत असताना आणि शहर व जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असताना कुंभमेळ्यावरून येणाऱ्या भाविकांची कोरोना तपासणी करा, अशी जोरदार मागणी एमआयएम पक्षाचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कुणाल खरात यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी आमच्या हॅलो महाराष्ट्रच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, शहरात कुंभमेळ्यावरून येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते,. अश्यावेळी विमानतळ, रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक आणि खासगी वाहनांमधून येणाऱ्या नागरिकांची प्रशासनाने कोरोना तपासणी करावी, आणि त्यांना कॉरनटाइन करावे. तसेच पॉझीटीव्ह रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे.
औरंगाबाद शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढली आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा प्रशासनाने विचार करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, असेही ते म्हणाले .