अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करताय? जाणून घ्या आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज अक्षय्य तृतीया असून आजच्या या शुभ दिवशी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक खुशखबर आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. भारतात 24 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 51,340 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची (10 ग्रॅम) किंमत 47,200 रुपये आहे. तर चांदीचा दर हा प्रतिकिलो 62,300 रूपये आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -51,590 रुपये

मुंबई
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,200रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,510 रुपये

नागपूर
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,590 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

Leave a Comment