हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| PF खात्यामध्ये किती पैसे जमा झाले आहेत याबाबत कर्मचाऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेली असते. परंतु हे पैसे नेमके कसे पाहिजे याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती नसते. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला घरी बसून PF (Provident Fund) कसा चेक करायचा? याच्या सोप्या पद्धती सांगणार आहोत. या पद्धतीने तुम्ही काही मिनिटातच तुमचा PF किती शिल्लक राहिला आहे याविषयी जाणून घेऊ शकता. लक्षात घ्या की, यात मिस्ड कॉल, एसएमएस, वेबसाइट्स आणि ग्राहक सेवा केंद्रे यांचा समावेश आहे. ज्यातून PF विषयी माहिती जाणून घेता येऊ शकते.
शिल्लक PF कसा तपासावा??
1) तुमच्या खात्यावर PF किती शिल्लक राहिला आहे?? हे तुम्ही मिस कॉलद्वारे तपासू शकता. यासाठी तुम्हाला 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर तुमच्या नंबरवर एक एसएमएस येईल. या एसएमएसमध्ये तुमच्या PF बॅलन्सची सविस्तर माहिती देण्यात आली असेल. म्हणजेच तुम्ही UAN नंबरशिवाय देखील PF पाहू शकता.
2) याबरोबर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने एसएमएसद्वारे शिल्लक PF पाहू शकता. यासाठी तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून EPFO UAN ENG टाइप करून 7738299899 या नंबरवर एसएमएस पाठवावा लागेल. यानंतर तुम्हाला मेसेजद्वारे PF किती शिल्लक राहिला आहे? याची माहिती देण्यात येईल.
3) घरबसल्या PF तपासण्यासाठी सर्वात प्रथम https://www.epfindia.gov.in/ या वेबसाईटवर जावा. त्यानंतर ‘For Employees’ > ‘Services’ > ‘Know your EPF Account Balance’ हा पर्याय निवडा. यानंतर UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाका. या प्रोसेसनंतर तुम्हाला तुमचा PF बॅलन्स स्क्रीनवर दिसून येईल.
4) इतकेच नव्हे तर तुम्ही EPFO ग्राहक सेवा केंद्राला भेट देऊन देखील तुमचा PF चेक करू शकता. यासाठी तुम्हाला UAN क्रमांक आणि ओळखीचा पुरावा जमा करावा लागेल. परंतु तुमच्या खात्यामध्ये काही समस्या असेल तर तुम्ही ईपीएफओच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून आपल्या अडचणी सांगू शकता. अशा विविध पद्धतीने तुम्हाला घरबसल्या तुमचा PF चेक करता येईल.