Chemical Fertilizers | मागील वर्षी पाऊस खूप कमी पडला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी देखील या दुष्काळामुळे त्रस्त झालेला आहे. त्याचप्रमाणे आता रासायनिक खतांच्या किमतीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मिश्र खते, सुपर फॉस्फेट, पोटॅश यांसारख्या खतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आता खरीप हंगाम चालू झालेला आहे. आणि या खरीप हंगामातच रासायनिक खते महागल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केलेली आहे. त्यासाठी आता खतांची देखील खरेदी करत होते. परंतु आता खतांच्या किमतीत मोठ्या संख्येने वाढ झाल्याने आता शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे बजेट देखील परवडत नाही.
पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने आता प्रति एकर 200 ते 300 रुपयांपर्यंतचा खर्च देखील वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात देखील वाढ झालेली आहे.
गेल्या दोन वर्षापासून सोयाबीनचे बाजारभाव देखील 5000 एवढाच आहे. सध्याला सोयाबीनचे भाव 4600 रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विक्री न करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
वाढलेले खत दर | Chemical Fertilizers
- 10-26-26 – 1470 ते 1700
- 20-20-0-13 – 1250 ते 1400
- 24-24-0 – 1550 ते 1700
- सुपर 500 – 550