रत्नागिरी हादरली!! केमिकल कंपनीत भीषण स्फोट ; 5 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रत्नागिरी जिल्ह्यातील खेड इथल्या औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.

घरडा ( Gharda ) केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झाल्याचे समजते. या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ३० ते ४० कामगार कंपनीत अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घरडा ही या औद्योगिक वसाहतीमधली सर्वात मोठी केमिकल कंपनी आहे. या कंपनीमध्ये एकामागोमाग २ स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात जखमी झालेल्यांना खेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment