मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर केमिकल टँकर पलटी; वाहतूक विस्कळीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई-पुणे एक्स्प्रस- वे वर खोपोली येथे टँकर पलटी होऊ मोठा अपघात झाला आहे. या अपघातामुळे एक्स्प्रेस-वे वर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे असून ८ ते १० किमी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आय.आर.बी यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्स, खोपोली पोलिसांचे मदत कार्य सुरू आहे

बोरघाट पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार आज सकाळी पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या केमिकलच्या चालकाचे खंडाळा बोगद्यापुढे नविन अमृतांजन पुलाजवळ नियंत्रण सुटले. टॅंकर दुभाजक ओलांडत पुणे बाजूकडे द्रुतगतीवर आडवा झाला. यावेळी टॅंकरने कंटनेरला धडक दिली. अपघातात दोन जण जखमी झाले आहे

यादरम्यान वाहतूक पुण्याकडे येणारी वाहतूक थांबविल्याने वाहनांच्या जवळपास आठ ते दहा किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. तर मुंबईकडे येणारी वाहतूकही विस्कळीत झाली. द्रुतगती वरील वाहतूक थांबविल्याने मुंबईकडे जाणारी वाहने लोणावळ्यातून वळविल्याने शहरातही वाहनांच्या लांब रांगा लागल्या.