हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात भारतीय रेल्वे नवनवीन इतिहास रचत आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस, वंदे मेट्रो, अमृत भारत ट्रेन, बुलेट ट्रेन या नवनवीन रेल्वेगाड्यांमुळे प्रवास आणि दळणवळण सोप्प झालं आहे. आता भारतीय रेल्वे आणखी एक नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. काश्मीर येथे स्थित असलेला जगातील सर्वात उंच स्टील आर्च रेल्वे पूल चिनाब ब्रिजवरून (Chenab Railway Bridge) रेल्वे धावली आहे. रेल्वे विभागाने सांगलदान ते रियासीपर्यंत इलेक्ट्रिक इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे, यामध्ये चिनाब ब्रिजचा सुद्धा समावेश होता. त्यामुळे आता लवकरच भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठ्या पुलावरून प्रवास करताना दिसेल.
आयफेल टॉवर पेक्षा उंच – Chenab Railway Bridge
चिनाब ब्रिज हा 359 मीटर उंच असून तो जो पॅरिसच्या आयफेल टॉवरलाही मागे टाकतोय. चिनाब नदीवर हा ब्रिज पसरलेला आहे. देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करत पहिल्या यशस्वी टेस्टिंगबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल, पहिली चाचणी ट्रेन सांगलदान ते रियासीपर्यंत यशस्वीपणे धावली आहे, त्यात चिनाब पूलचा सुद्धा समावेश होता. USBRL साठी सर्व बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे, फक्त बोगदा क्रमांक 1 अंशतः अपूर्ण राहिला आहे.
1st trial train between Sangaldan to Reasi. pic.twitter.com/nPozXzz8HM
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 16, 2024
दरम्यान, मंत्रालयाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होत असताना रेल्वे सुरक्षा आयुक्त डी सी देशवाल 46 किलोमीटर लांबीच्या सांगलदन-रियासी या दोन दिवसांत पाहणी करतील. उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी 27 आणि 28 जून रोजी तपासणी नियोजित केली आहे. कुमार म्हणाले की सीआरएस तपासणीसाठी सर्व आवश्यक ऍक्टिव्हीटी वेळेत केले जातील.
चिनाब रेल्वे पूल (Chenab Railway Bridge) हा 1486 कोटी रुपये खर्च करून नदीवरती बांधण्यात आला आहे. या बांधकामात एकूण 30,000 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत हा पूल बांधण्यात आला असून ही ट्रेन 7 स्थानकांवरून बारामुल्लाला पोहोचेल. खोऱ्यातील लोकांना येण्याजाण्याची व्यवस्थित सुविधा मिळावी हा त्याचा उद्देश आहे.