आयपीएल इतिहासात चेन्नई सुपर किंग्स प्रथमच स्पर्धेबाहेर ; प्ले ऑफच्या आशा मावळल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत धक्कादायक निकाल पाहायला मिळाला.तब्बल तीन वेळा आयपीएल चषक आपल्या नावावर केलेल्या व IPL च्या प्रत्येक पर्वात Play Off पर्यंत मजल मारणाऱ्या CSK ला प्रथमच अपयश पचवावे लागले. राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे सामना रंगतदार होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण, धोनीच्या संघातील दिग्गजांनी आज पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना निराश केलं आणि चेन्नईचा दारुण पराभव झाला. एकतर्फी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले.

चेन्नई सुपर किंग्सला या पराभवानंतर १० सामन्यांत ७ पराभवासह तळाला समाधान मानावे लागले आहे. आजच्या निकालानं त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीतूनही जवळपास बाहेर फेकले आहे. राजस्थान रॉयल्सनं १० सामन्यांत ४ विजयासह ८ गुणांची कमाई करत आव्हान कायम राखले आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या फॅफ ड्यू प्लेसिस आणि सॅम कुरन यांना मोठे फटके मारण्यापासून राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी रोखले. आर्चरच्या बाऊंसरवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका मारणाऱ्या फॅफ ड्यू प्लेसिसला ( १०) माघारी जावं लागले. शेन वॉटसन ( ८), अंबाती रायुडू ( १३) आणि सॅम करन ( २२) माघारी परतले.

कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पण, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांच्या टिच्चून माऱ्यासमोर त्या दोघांना धावा घेताना चाचपडावे लागले. १८व्या षटकात २८ धावांवर धोनी धावबाद झाला. चेन्नईला २० षटकांत ५ बाद १२५ धावा करता आल्या. जडेजा ३५ धावांवर नाबाद राहिला.

प्रत्युत्तरात राजस्थानची सुरुवातही निराशाजनक झाली. बेन स्टोक्स (१९), रॉबीन उथप्पा ( ४) आणि संजू सॅमसन ( ०) यांना लगेच माघारी जावे लागले. राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जोस बटलर यांनी चेन्नईच्या च्या गोलंदाजांचा सामना करताना अर्धशतकी भागीदारी केली आणि राजस्थानला विजयी केले. बटलरने ३७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या बाजूनं स्मिथ संयमी खेळ करत होता. त्यानं नाबाद २५ धावा केल्या. राजस्थाननं १७.३ षटकांत ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १२६ धावा करून विजय पक्का केला.

Leave a Comment