हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Chetna Sinha)। शेती हा एक व्यवसाय आहे… शेती म्हणजे फक्त जीवन जगण्याचे साधन नाही. ,, त्यामुळे एखादी महिला शेतात काम करत असेल तर ते त्यांचं जस रोजच जीवन असलं तरी ती एक उद्योजिकता सुद्धा आहे. त्या उद्योजिकतेच कसब पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आहे असं विधान माणदेशी महिला बँकेच्या संस्थापिका चेतना सिन्हा (Chetna Sinha) यांनी केलं आहे… आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त ‘हॅलो कृषी’च्या ग्रामीण महिला आणि आर्थिक स्वातंत्र्य या विशेष पॉडकास्ट मध्ये बोलताना त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं…. माणदेशी बँकेची स्थापना का व कशी कशी केली? तसेच गावातील महिलांना कोणता व्यवसाय करायचा असेल? तर काय करावं? याच्या टिप्सही चेतना सिन्हा यांनी दिल्या….
यावेळी चेतना सिन्हा (Chetna Sinha) यांनी म्हंटल, महिला जर शेती करत असेल तर ती महिला दूध विकते, कोंबड्या पाळते, कुकुटपालन करते… प्रोसेसिंग युनिट मध्येही त्यांनी सहभाग घ्यावा… उदाहरणार्थ अनेक महिलांनी डाळ मिल सुरु केली असून त्या पॅकिंग करून डाळ विकतात… कोरोना काळानंतर हेल्थी फूड चे महत्व लोकांना समजलं आहे.. आणि या हेल्थी फूडची माहिती या महिलांना आहे. शेतीमधील उद्योजगतेची बौद्धिकता पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आहे… एखाद्या वनस्पती मधून तेल कस काढावे हे सुद्धा महिलांना माहितेय….
सध्याच्या काळात महिलांनी जांभळाची पोळी , कवठाची बर्फी, जैन घोंगडी, असे प्रॉडक्ट बनवावे… कारण अशा गोष्टी मोठमोठ्या मॉल मधेही मिळत नाही…. उन्हाळ्यात तुम्ही चहा विकण्यापेक्षा ताक विका, कारण ते ताक तुम्हाला थंडावा देईल.. जेव्हा तुम्ही खाद्य प्रदार्थाच्या निगडित व्यवसाय करत असाल तर तुमची क्वालिटी सुद्धा चांगली असावी, त्यासाठी एखाद्या एक्स्पर्ट ची मदत घेतली तरी चालेल… तुमच्या व्यवसायाचे नाव सोप्प असावं जेणेकरून लोकांच्या लक्षात राहील आणि लोगोही असा असावा कि ते चित्र लोकांना लगेच क्लिक होईल असं चेतना सिन्हा यांनी म्हंटल. विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी महिलांना शिकवण्यासाठी देशी MBA हा कोर्सही चेतना सिन्हा यांच्या माणदेशी फाउंडेशनने सुरु केलाय.
माणदेशी महिला बँकेची स्थापना कशी झाली- Chetna Sinha
यावेळी माणदेशी महिला बँकेची स्थापना कशी झाली? याचा किस्साही चेतना सिन्हा यांनी सांगितला… माणदेशी महिला बँक सुरु करण्यासाठी मजुरी करणाऱ्या, भाजीपाला विकणाऱ्या, टेलरिंग काम करणाऱ्या अशा अनेक महिलांनी स्वतः भागभांडवल दिले, शेअर घेतले.. तसेच फिरून फिरून पैसेही गोळा केले… या गोष्टींचा महिलांना खूप अभिमानही होता…. त्यावेळी खरं तर खेड्यातील माणसे महिलांना नावे ठेवायचे…याना साधा कचरा पण गोळा करता येत नाही, मग या बँका काय उभारणार असं खिजवलं जात होते, कचरा बँक- कचरा बँक म्हणून हिणवलं जात होत. .. परंतु तरीही महिला शांत बसल्या नाहीत.. आम्ही रिजर्व बँकेला प्रोपोजल दिले, मात्र महिला शिकलेल्या नाहीत, त्यांचं शिक्षण नाही आणि त्यांना सही सुद्धा येत नाही असं सांगून आरबीआयने आमच्या महिला बँकेचा प्रस्ताव सुरुवातीला फेटाळला… परंतु महिलांनी धीर सोडला नाही, उलट तडक रिजर्व बँकेचे कार्यालय गाठले .. पुन्हा एकदा अधिकाऱ्यांशी बैठक झाली…. आणि अखेर १९९७ ला देशातील पहिली ग्रामीण महिला बँक स्थापन करण्याचे लायसन आरबीआयने दिले अशी माहिती त्यांनी दिली.