छगन भुजबळच शाहू महाराजांच्या विचाराचे खरे वारसदार- छत्रपती संभाजीराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. मी छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. पण मंत्री छगन भुजबळ शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार आहेत अशा शब्दात त्यांनी भुजबळांचे कौतुक केले आहे. संभाजीराजेंनी नाशिक येथे छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंडभरुन कौतुक केलं.

संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शाहू महाराज आणि नाशिकचा ऋणानुबंध आहे. नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेला त्यांनी मोठी मदत केली होती. छगन भुजबळ शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे चालवीत आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावर आपण सर्वांनी एकत्रित आल्यावर आपल्याला न्याय मिळणार आहे. त्यामुळे बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही श्री. संभाजीराजे यांनी सांगितले.

दुसरीकडे भुजबळांनी देखील संभाजीराजेंच्या कामाचं कौतुक केलं. संभाजीराजेंनी खासदार म्हणून अतिशय उत्तम काम केल्याची पोचपावती भुजबळांनी दिली. तर राज्य आणि देश एका वेगळ्या स्थित्यांतरातून जातेय. या देशाला फुले शाहू आंबेडकरांचेच विचार वाचवू शकतात, असं प्रतिपादन भुजबळांनी केलं.

Leave a Comment