हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एकेकाळी उद्धव ठाकरेंवर टीका करताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा नाव घेतलं होते. बाळासाहेब ठाकरेंना ज्या माणसाने अटक केली त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठाकरे बसले असं राज ठाकरे म्हणाले होते. त्याबाबत छगन भुजबळ याना विचारल असता त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेबांचे आणि माझे मंडल आयोगवरून मतभेद झाले पण तुमचं काय? तुम्ही बाळासाहेबांना का सोडलं? तुम्ही बाळासाहेबांकडे काय मागणी केली होती? असा सवाल छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंना केला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत छगन भुजबळ म्हणाले, राज ठाकरे लहान होते तेव्हा शाळेतून आले नाहीत की बाळासाहेब (Balasaheb Thackeray) विचारायचे राजा अजून कसा आला नाही? माँ विचारायच्या राजा का आला नाही? राज ठाकरे घरी आल्याशिवाय माँ आणि बाळासाहेब हे पती-पत्नी दोघंही जेवत नव्हते. माझे आणि बाळासाहेबांचे तर मंडल आयोग किंवा इतर कशावरुन मतभेद झाले. पण राज ठाकरेंचं काय? तुमचे मतभेद कशावरुन झाले? मतभेद झाले तरीही तुम्ही हे लक्षात घ्यायचं होतं की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे. मग तुम्ही बाळासाहेबांपासून वेगळं व्हायचं कारण काय? तुमची बाळासाहेबांकडे काय मागणी होती सांगा ना लोकांना. मतभेद होते तरीही सांभाळून घ्यायला नकोत? बाळासाहेबांना किती दुःख झालं असेल की ज्याला मी लहानपणापासून सांभाळत आलो, ज्याच्यासाठी मी जेवत सुद्धा नसतो त्याने असं करावं याच बाळासाहेबां किती वाईट वाटलं असेल असं म्हणत भुजबळ यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
भुजबळ पुढे म्हणाले, राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूकच केली. त्यांनी मनसे पक्ष काढला तो पुढचा भाग झाला… त्यावेळी दोघांकडून एकमेकांवर टीका झाली. शिवसेना आणि राज ठाकरेंवर किती टीका टिपण्णी झाली. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना सांगितलं असतं की हे नाही तर ते काम कर. तर त्यांनी ऐकायचं होतं. मात्र ऐकलं नाही. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा मी दोघांनाही फोन केला आणि बोललो की पाच ते सहा दिवस एकमेकांविरोधात काहीही बोलू नका. राग हा त्या क्षणापुरता असतो, राग शांत झाला की मन बदलतं. दोघांनीही ऐकलं पण मतभेद झाले आणि राज ठाकरेंनी त्यांचा निर्णय घेतला असं भुजबळ यांनी म्हणत राज ठाकरेंवर आपली तोफ डागली.