हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chhatrapati Sambhaji Nagar) आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पाहण्यासाठी न केवळ देशातून तर विदेशातून देखील बरेच पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. आपल्या महाराष्ट्राला नैसर्गिक सांधनसंपत्तीसह विशेष ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अशा या समृद्ध महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर ओळखले जाते. याचे कारणही तसेच आहे. पानचक्की, मुघलकालीन दरवाजे, सोनेरी महल, वेरुळ अजिंठा लेणी, बुद्ध लेणी अशी अनेक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे या ठिकाणी आहेत आणि म्हणून छत्रपती संभाजी नगरमला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हटले जाते. चला तर या जिल्ह्यातील खास पर्यटनस्थळांची सविस्तर माहिती घेऊया.
दौलताबाद किल्ला (Chhatrapati Sambhaji Nagar)
औरंगाबाद अर्थात संभाजी नगरपासून १५ किलोमीटर वेरुळजवळ असलेला दौलताबाद किल्ला हा अत्यंत प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. दौलताबाद किल्ला हा मूळचा देवगिरी किल्ला. दौलताबाद किल्ला हा उत्कृष्ट स्थापत्यकलेचा दर्जेदार नमुना आहे. त्यामुळे हा किल्ला पहायला देश- विदेशातून बरेच लोक येत असतात.
अजिंठा – वेरूळ लेणी
औरंगाबादमधील अजिंठा- वेरूळ लेणी अतिशय प्रसिद्ध आहेत. यातील अजिंठा लेणी औरंगाबादचे प्रमुख आकर्षण असून या लेण्या भगवान गौतम बुद्धांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनाची कथा दर्शवितात. (Chhatrapati Sambhaji Nagar) तर वेरूळ लेण्यांना १९५१ साली भारत सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत केले. या लेण्यांमध्ये हिंदू, जैन आणि बुद्ध अशा तिन्ही धर्माचे शिल्प कोरलेले आहे.
सोनेरी महल
सोनेरी महल हा एक ऐतिहासिक राजवाडा आहे. जो बुंदेलखंडच्या सरदाराने बांधले होता. औरंगाबादच्या पहारसिंगपुरा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात हा सोनेरी महाल आहे. (Chhatrapati Sambhaji Nagar) हा राजवाडा ठराविक राजपूत शैलीत बांधलेला असून याच्या भव्य दोन संग्रहित इमारत आहेत. एकेकाळी सोन्याने रंगवलेल्या चित्रांवरून त्याला सोनेरी महल असे नाव देण्यात आले. या महालाचे प्रवेशद्वार पूर्ण कमानींनी सजवलेले असून अत्यंत आकर्षक आहे.
५२ दरवाजे
औरंगाबादची विशेष ओळख म्हणजे हे शहर ५२ दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रत्यक्षात छत्रपती संभाजीनगर हे शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर बांधण्यात आलेल्या ५२ प्रवेशद्वारामुळे वेशींचे शहर म्हणून ओळखले जाते. (Chhatrapati Sambhaji Nagar) एकूण ५२ मोठ्या दरवाज्यांपैकी सर्वात प्रसिद्ध, सर्वात जुना आणि सर्वात मोठा दरवाजा म्हणजे भडकल दरवाजा. जो मलिक अंबरने मुघलांवरील विजयाच्या स्मरणार्थ बांधला होता.
बीबी का मकबरा
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘बीबी का मकबरा’ हे अत्यंत सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळ आहे. या ऐतिहासिक वास्तूला महाराष्ट्राचा ‘ताजमहल’ म्हणून ओळखले जाते. (Chhatrapati Sambhaji Nagar) दिल्लीतील ताजमहल प्रमाणेच याची रचना असल्यामुळे हे ठिकाण आणि ही वास्तू पहायला अनेक पर्यटक आवर्जून येताना दिसतात.