शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त संभाजीराजेंचं नवं ट्वीट; शेअर केला ‘हा’ ऐतिहासिक फोटो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी शिवकालीन ‘होन’ चा फोटो शेअर केले आहे. यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन ‘होन’ च्या साक्षीने साजरा होणार असे संभाजी राजे यांनी म्हंटल.

ते पुढे म्हणाले, स्वराज्याचे सार्वभौमत्व व संपन्नतेचे प्रतीक असणारा ‘होन’ हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे; राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा आहे. रायगडच्या पवित्र भूमीत मिळालेल्या या ऐतिहासिक ‘होन’च्या साक्षीनेच यंदाचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार.

दरम्यान, यंदाचा कोरोना प्रादुर्भाव पाहता संभाजीराजे छत्रपती यांनी प्रामुख्यानं शिवप्रेमींनी 6 जूनला रायगडावर शिवप्रेमींची गर्दी होऊ नये म्हणून त्यांनी घरीच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची विनंती केली आहे. शिवराय मनामनांत – शिवराज्यभिषेक दिन घराघरांत’ या भावनेतून घरीच हा सोहळा साजरा करण्याचं आवाहन शिवप्रेमींना संभाजीराजेंनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment