हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध MIM … महाराष्ट्र लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात होणारी ही छत्रपती संभाजीनगरची सर्वात मोठी वादळी निवडणूक… 1989 पासून बाळासाहेब ठाकरेंनी ‘खान हवा की बाण हवा’ असा प्रचार करत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावर भगवा फडकवला तो कायमचा.. सध्याचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे 1999 पासून ते 2019 पर्यंत छत्रपती संभाजीनगरमधून सलग चार टर्म खासदार राहिले… पण 2019 च्या निवडणुकीत वंचित आणि एमआयएम हे समीकरण एकत्र आल्यानं खैरेंना अवघ्या अडीच हजार मतांनी पराभव होत इम्तियाज जलील यांच्या रूपानं एमआयएमचा पहिला खासदार लोकसभेत गेला…पण उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून मशाल विरुद्ध धनुष्यबाण आणि सोबत वंचित, एमआयएम यांच्यातही कडव आव्हान असणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये वारं नेमकं कुणाच्या बाजूने आहे? शिवसेनेचा नेमका कुठला गट लोकसभेच्या मैदानात चार पावलं पुढे आहे? की पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम यांच्याच बाजूने कौल जातोय? हेच पाहुयात
शिवसेनेचा मुंबई बाहेरचा कुठला अभेद्य बालेकिल्ला असेल तर तो छत्रपती संभाजीनगरचा… 1989 साली बाळासाहेबांच्या प्रयत्नांनी इथे भगवा फडकला तो कायमचाच… चंद्रकांत खैरे हे तर 1999 पासून ते 2019 पर्यंत शिवसेनेचे चार टर्मचे खासदार राहिले… इथली पारंपारिक लढत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच राहिली… मात्र 2019 ला इथे एमआयएमने वंचितच्या मदतीने उडी घेतली आणि मतदारसंघाचे डायनॅमिक्स बदलून टाकले… या निवडणुकीत इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे यांच्यासोबत मराठा चेहरा असलेल्या हर्षवर्धन जाधवांनीही लोकसभेच्या मैदानात उडी घेतली… मराठा आरक्षणाचा मुद्दा जाधवांनी प्रतिष्ठेचा बनवून जवळपास सव्वातीन लाख मत मिळवली… या मत विभाजनाचा फटका खैरेंना बसला. आणि अवघ्या अडीच हजार मतांच्या लीडने इम्तियाज जलील खासदार झाले…
पण 2019 नंतर महाराष्ट्राचं राजकारण अनेक पातळ्यांवर बदलत गेलं. शिवसेना फुटली… दोन गट पडले.. मतदारसंघातही जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी शिंदेंच्या बंडाला साथ दिली… त्यामुळे 2024 ला होत असलेल्या या निवडणुकीत ठाकरेंकडून चंद्रकांत खैरे… शिंदे गटाकडून संदिपान भुमरे… एमआयएमकडून इम्तियाज जलील… वंचितकडून अफसर खान… तर अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव… लोकसभेच्या रिंगणात आहेत. पण निकाल काय लागेल या अंदाजाच्या दृष्टीने अत्यंत गुंतागुंतीच्या बनलेल्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात वारं कोणत्या बाजूने आहे? त्याचा थोडा अंदाज घेऊ…
एमआयएमकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार इम्तियाज जलील निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र यावेळेस वंचितची साथ त्यांना नसणारय. एमआयएम भाजपची बी टीम असल्याचा जो प्रचार केला जातोय त्याचा फटकाही या निवडणुकीत जलील यांना बसण्याची शक्यता दाट आहे. दुसरीकडे खासदारकीच्या काळात केलेल्या अनेक आंदोलनांमुळे, लोकसभेतील भाषणांमुळे आणि विकासाच्या मुद्द्यांमुळे त्यांच्या नावाची क्रेझ मतदारसंघात आहेच. सोबतच हिंदू मुस्लिम सलोखा ही लाईन ते पुढे घेऊन जात असल्याने त्याचा फायदाही त्यांना उद्या मतदानाच्या दिवशी होऊ शकतो… जलील यांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवेसी यांनी आतापर्यंत मतदारसंघात तीन जाहीर सभा घेतल्या आहेत… पण ‘बाबरी मशीद जिंदाबाद’ आणि सोबतच अँटी हिंदू नरेटीव्ह पुढे आणल्यामुळे याचा लॉसही त्यांना होऊ शकतो…
दुसरीकडे चंद्रकांत खैरे हे पहिल्यांदाच मशाल या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरून धनुष्यबाणाच्या विरोधात प्रचार करतायत… ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीच्या लाटेचा… अंबादास दानवे यांच्या नेटवर्कचा… आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा… मोठा सपोर्ट खैरेंच्या पाठीशी आहे. गद्दार की खुद्दार असं नरेटीव ठाकरे गटाकडून सेट केलं जात असल्यानं याचा मोठा फायदा खैरेंना होऊ शकतो. सोबतच मतदारसंघातील तीन शिवसेनेचे आमदार शिंदें सोबत गेले असले तरी कार्यकर्त्यांची फळी ही आजही ठाकरेंशी एकनिष्ठ आहे. थोडक्यात छत्रपती संभाजीनगरच्या मैदानात मशालीला निवडून येण्याचे जास्त चान्सेस वाटतात…
तिसरीकडे भाजप की शिवसेना यांच्यात बरीच खलबत होऊन उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटाला शिंदे गटाला ही जागा सुटून संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. कागदावरचं गणित पाहिलं तर महायुतीची ताकद ही जिल्ह्यात जास्त दिसते. तब्बल पाच आमदार हे महायुतीच्या बाजूने आहेत. पण भागवत कराडांची निवडणूक लढण्याची इच्छा असतानाही त्यांना तिकीट नाकारल्यानं भाजपचे आमदार भुमरेंचं काम म्हणाव्या इतक्या फोर्सने करत नसल्याचं बोललं जातंय… महायुतीला मत म्हणजे मोदींना मत या टॅगलाईनचा भुमरे यांना जितका फायदा होऊ शकतो. तितकीच मोदी विरोधी मतं यामुळे खैरे किंवा जलील यांच्याकडे शिफ्ट होऊ शकतात.. त्यात प्रचारालाही भुमरेंना अगदी थोडा वेळ मिळाल्याने ते किती मतं पदरात पाडून घेतात, हे बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे….
राहता राहिला प्रश्न वंचित आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा… तर यंदाच्या निवडणुकीत वंचितचा म्हणावा असा प्रभाव नाहिये…तर हर्षवर्धन जाधवांचीही हवा नाहीये… एकूणच सगळं गणित नीट पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या मतदारसंघात ठाकरेंच्या लाटेमुळे चंद्रकांत खैरे यांचेच निवडून येण्याचे चान्सेस जास्त दिसतायेत…बाकी छत्रपती संभाजीनगरचा पुढचा खासदार कोण असेल? तुमचं मत कोणाला राहील? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.