मराठा आरक्षण: संभाजीराजेंच्या नेतृत्वात आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेणार राष्ट्रपतींची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही कायम असून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अजूनही तापलं आहे. याच प्रश्नावरून राज्यातील सर्वपक्षीय खासदार आज गुरूवार २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली ही भेट होणार आहे.

या भेटीदरम्यान संभाजीराजे यांच्या आवाहनानुसार सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळही राष्ट्रपतींसोबत चर्चा करणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत.

शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि कॉंग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत.

You might also like