शिवभक्तांसाठी सुवर्णसंधी! 5 दिवसांत गड-किल्ल्यांचा इतिहास जवळून अनुभवता येणार, IRCTCची खास टूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Tour: महाराष्ट्रभर छत्रपती शिवाय महाराजांच्या पाऊलखुणा आहेत. इथले गड किल्ले अजूनही इतिहासाची साक्ष देतात. हाच इतिहास जवळून पाहण्याची, अनुभवण्याची संधी आता IRCTC ने आणली आहे. आयआरसीटीसीने (IRCTC) ‘भारत गौरव ट्रेन’ अंतर्गत एक खास हेरिटेज टूर ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ जाहीर केली आहे. महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण ठिकाणांना भेट देणारी ही पाच दिवसांची ऐतिहासिक यात्रा 9 जून 2025 पासून सुरू होणार आहे. टूर मुंबई सीएसएमटीहून सुरू होईल आणि तिथेच समाप्त होईल, तसेच दादर आणि ठाणे येथून देखील बोर्डिंगची सोय आहे.

प्रमुख स्थळे आणि त्यांचे ऐतिहासिक महत्त्व (Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Tour)

  • शिवनेरी किल्ला (जिल्हा: जुन्नर): छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याठिकाणी झाला.
  • लाल महाल आणि कसबा गणपती (पुणे): बालशिवाजीच्या वास्तव्याची साक्ष देणारे ऐतिहासिक स्थळ.
  • प्रतापगड किल्ला (सातारा): अफजल खानाचा पराभव या ठिकाणीच झाला.
  • पन्हाळा किल्ला (कोल्हापूर): महाराजांचा महत्त्वाचा लढाऊ किल्ला.
  • भीमाशंकर ज्योतिर्लिंग: १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक, निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये वसलेले.
  • कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर: अंबाबाई मंदिर, स्थानिक ग्रामदेवतेचे प्राचीन मंदीर.

टूरचे संपूर्ण मार्ग आणि वेळापत्रक (Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Tour)

  • दिवस 1: मुंबईहून प्रस्थान – पुणे (लाल महाल, कसबा गणपती)
  • दिवस 2: शिवनेरी व भीमाशंकर दर्शन
  • दिवस 3: प्रतापगड – रायगड दर्शन
  • दिवस 4: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर व पन्हाळा किल्ला
  • दिवस 5: परतीचा प्रवास – मुंबई आगमन (6 व्या दिवशी सकाळी) दर आणि सुविधा (Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Tour)
श्रेणीदर (प्रति प्रवासी)सोयी-सुविधा
इकोनॉमी (Sleeper)₹13,155नॉन-एसी ट्रेन, नॉन-एसी हॉटेल, शाकाहारी जेवण
कम्फर्ट (3AC)₹19,8403AC ट्रेन, एसी हॉटेल, शाकाहारी जेवण
सुपीरियर (2AC)₹27,3652AC ट्रेन, प्रीमियम एसी हॉटेल, शाकाहारी जेवण

प्रत्येक पॅकेजमध्ये समाविष्ट

  • रेल्वे आणि स्थानिक प्रवास
  • हॉटेलमध्ये राहण्याची सोय (AC/Non-AC)
  • ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शाकाहारी जेवण
  • मार्गदर्शक सेवा व पर्यटन विमा

बुकिंग कसे कराल? (Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Tour)

टूरसाठी बुकिंग IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर (www.irctctourism.com) किंवा जवळच्या IRCTC कार्यालयात करता येऊ शकते. या टूरसाठी जागा मर्यादित आहेत, त्यामुळे लवकर बुकिंग करणे फायदेशीर ठरेल. शिवप्रेमींसाठी ही एक ऐतिहासिक यात्रा ठरणार आहे, जिथे इतिहास, संस्कृती आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे.