Chhatrapati Shivaji Maharaj : ‘ज्ञानी, जिज्ञासू, धाडसी…’; ‘असे’ होते छत्रपती शिवाजी महाराज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chhatrapati Shivaji Maharaj) आज महाराष्ट्रात तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ‘जाणता राजा’ किंवा ‘रयतेचा राजा’ म्हणून संपूर्ण जगभरात ओळखले जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास अत्यंत भव्य, प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. या इतिहासातून शिवरायांच्या स्वभावातील काही गुणधर्मांचे विशेष वर्णन करण्यात आले आहे.

ज्यामध्ये सहिष्णुता, दूरदृष्टी, ज्ञानी, जिज्ञासू, धाडसी, करारी अशा अनेक गुण विशेषांचा समावेश आहे. मात्र तरीही नेमके महाराज कसे होते? हे सांगणे अवघडच!! ज्याच्या त्याच्या मनात वसलेले महाराज हे ज्याच्या त्याच्यासाठी वेगळे मात्र दैवत आहेत. आज तरुणांची मोट बांधण्यासाठी विविध भागात शिवजयंती साजरी केली जात आहे.

विविध गोष्टी, आख्यायिका हे शिवरायांचे जीवन आणि त्यांचे चरित्र याविषयी भाष्य करतात. दरम्यान, आजपर्यंत इतिहासाच्या माध्यमातून आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनेक गोष्टी वाचल्या असतील. आजकाल भव्य रुपेरी पडद्यावर शिवरायांचा सुवर्ण इतिहास दाखवला जातो. त्यामुळे आजची पिढी छत्रपतींना इतिहासात उल्लेख केलेल्या विविध घटना, प्रसंग आणि माहितीच्या आधारे ओळखते. (Chhatrapati Shivaji Maharaj) अशाच काही महत्त्वाच्या आणि तितक्याच रंजक गोष्टी इतिहासात नमूद केलेल्या आहेत. ज्यामधून छत्रपती शिवाजी महाराज नक्की कसे होते? याची कल्पना करता येते. चला तर जाणून घेऊयात उभ्या महाराष्ट्राचे आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही रंजक गोष्टी…

शिवरायांचा जन्म

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी इ.स. १६३० साली झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या ‘शिवनेरी’ या डोंगरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊंच्या पोटी तेजस्वी बालकाने अर्थात शिवरायांनी जन्म घेतला. (Chhatrapati Shivaji Maharaj) एकीकडे शिवरायांचा जन्म झाला आणि दुसरीकडे शिवनेरीच्या नगारखान्यात सनई, चौघडा वाजवण्यात आला. या किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे. या देवीच्या नावावरून नवजात शिशुचे ‘शिवाजी’ असे नाव ठेण्यात आहे. पुढे आपल्या पराक्रमांमूळे ते छत्रपती झाले.

शिवजयंती

महाराष्ट्रात दरवर्षी २ प्रकारे शिवजयंती साजरी केली जाते. एक तिथीनुसार आणि दुसरी तारखेनुसार. संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. परदेशातून अनेक विद्वान, तत्त्वज्ञ, इतिहासकार हे भारतात छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी येत असतात. मात्र आजपर्यंत त्यांचा पूर्ण इतिहास कुणी अभ्यासू शकलेलं नाही. अत्यंत प्रभावी इतिहासाच्या काही घटनांचा उलगडा होताच त्याची भव्यता समजून येते. (Chhatrapati Shivaji Maharaj)

ऐतिहासिक गड- किल्ले

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यावेळी सुमारे ४०० किल्ले त्यांच्या अधिपत्याखाली होते. यातील काहींचे बांधकाम त्यांनी स्वतः केले होते. असे सांगतात की, वयाच्या १७ व्या वर्षी शिवरायांनी स्वतः डिझाइन करून राजगड बांधला होता. तसेच काही किल्ले त्यांनी लढाई करून जिंकले होते. (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराजांचे अनेक गड- किल्ले आजही त्यांच्या इतिहासाची साक्ष देतात. यातील एक एक गड-किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतिकच आहे. स्वराज्य स्थापना करतेवेळी यांपैकी काही किल्ल्यांचे मोठे योगदान लाभले. ज्यामध्ये शिवनेरी किल्ला, तोरणा किल्ला, पन्हाळा किल्ला आणि सिंहगड किल्ल्याचा समावेश आहे.

अभ्यासू, अभियंता आणि भूगर्भशास्त्रज्ञ

छत्रपती शिवाजी महाराज हे अभ्यासक होते. प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करून त्यावर कृती करणे हा त्यांचा एक खास गुण होता. ज्याचा वापर त्यांनी गडकिल्ले बांधताना केला. महाराजांनी बांधलेल्या कोणत्याही किल्ल्यावर गेले असता आपल्या लक्षात येईल की इथे कोणत्याही पाईपलाईनचे काम केलेले नाही. मात्र तरीही अगदी उन्हाळ्यातसुद्धा किल्ल्यांवर ४ हजार फूट उंचीवरील टाक्यांमध्ये स्वच्छ पाणी आढळते. (Chhatrapati Shivaji Maharaj)

शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावर २ प्रकारचे हौद बांधले होते. यापैकी एक खुले तर दुसरे भूगर्भात बांधण्यात आल्याचे दिसून येते. मुख्य म्हणजे या बांधकामात खडक फोडण्यासाठी त्यांनी कधीही दारुगोळा वा सुरुंग वापरले नाहीत. तर नैसर्गिक साधनांचा वापर केला. या आयताकृती टाक्यांमधील पाणी संपूर्ण गडावर वापरले जायचे. तसेच हे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी नैसर्गिक तंत्राचा वापर केला जायचा.

​शिवाजी महाराजांचे जातीवंत घोडे

छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे होते. ज्यांपैकी काही घोड्यांचा वापर ते निर्णायक प्रसंगी करत असत. त्यांच्या अनेक मोहिमांमध्ये काही घोड्यांची चांगली साथ लाभली. यातील ७ घोड्यांचा विशेष उल्लेख केला जातो. मोती, विश्वास, तुरंगी, इंद्रायणी, गाजर, रणभीर, कृष्णा अशी या सात घोड्यांची नाव आहेत.

शिवरायांचे ​अष्टप्रधान मंडळ

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अष्टप्रधान मंडळाचे फार महत्त्व होते. यात ८ मंत्री होते. ज्यांचे ३० विभागांत काम विभागले होते. यातील कामाच्या व्यवस्थापनासाठी एकूण ६०० कर्मचारी होते. या अष्टप्रधान मंडळासोबत सल्ला मसलत करून महाराज समोर येणाऱ्या प्रकरणांचा निकाल लावत असे.

जाणता राजा (Chhatrapati Shivaji Maharaj)

जगाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे होते ज्यांच्या चारित्र्यावर कुणीही शिंथोडे उडवण्याची हिंमत करू शकत नाही. कारण शिवरायांच्या दरबारी कधीही स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही. तसेच त्यांनी स्वतःसाठी कधीच मोठे महाल बांधले नाहीत वा सत्तेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला नाही. अत्यंत चारित्र्यसंपन्न राजा अशी त्यांची ओळख कायम आहे.

तसेच रयतेला लेकराप्रमाणे सांभाळणारे राजे क्षणाक्षणाला स्वराज्य आणि रयतेच्या सुखाचा विचार करत. मशेतकऱ्यांचा रोजगार वाढण्यासाठी छत्रपतींनी इंग्रज, डच आणि पोर्तुगीज यांचे डाव हाणून पाडले. शिवाय आया बहिणींच्या अब्रूचे रक्षण केले आणि म्हणूनच छत्रपतींना ‘रयतेचा राजा’ तसेच ‘जाणता राजा’ असे म्हटले जाते. (Chhatrapati Shivaji Maharaj)