हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Chhava Movie Collection – गेल्या काही दिवसापासून ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलरने धुमाकूळ घातला होता. अखेरी तो काल 14 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहेत . या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 30 कोटींच्यापेक्षा जास्त कमाई केली आहे, जे अपेक्षेपेक्षा अधिक आहे. ज्यामुळे तो यंदाच्या वर्षीचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे.
तब्बल 33.1 कोटींची कमाई (Chhava Movie Collection)–
बॉलिवूड अभिनेत्री विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘छावा’ ने अनेकांना भारावून टाकले आहे. ‘छावा ‘ने तब्बल 33.1 कोटींची कमाई केली, ज्यामुळे त्याने अनेक चित्रपटांचे रिकॉर्ड मोडले आहे. हा चित्रपट लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे.
आधीच्या रेकॉर्डला मागे टाकत –
याआधी अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाने 15 कोटी 30 लाख रुपयांची कमाई करत रेकॉर्ड केला होता, पण ‘छावा’ने त्याच्या आधीच्या रेकॉर्डला मागे टाकत 33.1 कोटींची कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाने (Chhava Movie Collection) पूर्वीच्या ‘गली बॉय’ या चित्रपटाला मागे टाकत सुमारे 60% अधिक कमाई केली आहे. चित्रपटाचा प्रतिसाद आणि कमाई बघता स्पष्ट दिसून येते की ‘छावा’ आगामी आठवड्यात 100 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवेल.
अभिनय आणि कथानकाने चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती –
अजून चित्रपटाच्या एकूण कमाईबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण अनेक रिपोर्ट्सनुसार, ‘छावा’ने (Chhava Movie Collection) पहिल्या दिवशी 32 ते 34 कोटींचा गल्ला केला आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचे दमदार अभिनय आणि कथानकाने चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. चित्रपटाच्या यशानंतर निर्माता आणि चित्रपट क्षेत्रात आनंदाचा माहौल निर्माण झाला आहे.