अजित पवारांचे थेट राष्ट्र्पतींनाच पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस पार पडला. दरम्यान आज अनेक मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांच्यात चरचा करण्यात आली. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट राष्ट्रपती राम नाथजी कोविंद यांना पत्र लिहले. “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषा विभागाच्या वतीनं महामहिम राष्ट्रपती महोदय श्री राम नाथजी कोविंद साहेब यांना पत्र लिहून विनंती करण्याची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या पत्रमोहिमेत सहभाग घेतला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी विनंती पवार यांनी पत्रातून केली आहे.

सध्या मुंबईत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात राज्य सरकारकडून अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. तसेच कायदेही केले जात आहे. या दरम्यान महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी आग्रही मागणी होत असल्याने अधिवेशनाचा तिसरा दिवस संपल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट राष्ट्र्पतींनाच पत्र लिहले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रपतींना लिहलेले पत्र ट्विट केले असून त्यातून त्यांनी “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषा विभागाच्या वतीनं महामहिम राष्ट्रपती महोदय श्री राम नाथजी कोविंद साहेब यांना पत्र लिहून विनंती करण्याची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या पत्रमोहिमेत सहभाग घेतला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment