हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| झारखंड उच्च न्यायालयाने कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना जामीन मंजूर केला आहे. हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप लावण्यात आला होता. परंतु आता याचप्रकरणी त्यांना 5 महिन्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. सध्या हेमंत सोरेन हे रांचीच्या होटवार येथील बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात आहेत.
कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांनी बडगई परिसरातील 8.86 एकर जमिनीवर अनधिकृतपणे बळकावली आहे. परंतु ईडीचे हे आरोप हेमंत यांनी सातत्याने फेटाळून ही लावले होते. त्यानंतर झालेल्या सुनावणीत सोरेन यांचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की, त्यांच्या अशिलाला विनाकारण गोवले जात आहे. यावेळी त्यांनी, केंद्र सरकारवर ही आरोप केले. अखेर दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.