Monday, February 6, 2023

मान्सूनपूर्व परिस्थितीचा मुख्यमंत्री ठाकरेंकडून आढावा

- Advertisement -

मुंबई । मे महिना संपल्यातच जमा आहे. जून सुरु होताच मान्सूनची चाहूल लागण्याची शक्यता आहे. राज्यात आता कोरोनाची परिस्थिती सर्वाधिक बिकट आहे. अशा परिस्थितीत मान्सूनसाठी आपण तयार असले पाहिजे. आधीच संचारबंदीमुळे नुकसानीस सामोरे जावे लागले आहे. मान्सूनमध्ये कोणते नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यभरातून संबंधित उपस्थित होते. यावेळी आम्ही बचाव कार्य करू पण सध्याच्या कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगली पाहिजे असे सांगितले.

 

- Advertisement -

राज्यात सर्वत्र पावसाची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. संचारबंदीमुळे राज्यात आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. मागच्या वर्षी राज्याच्या विविध भागात आलेल्या पुराचाही धोका नाकारता येत नाही. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री विजय वडेट्टीवार, एमओएस प्राजक्त तनपुरे, रेल्वे, सैन्य, नौदल, हवाईदल, तटरक्षक दल, आयएमडी आदींच्या मुख्य सचिवांसोबत मान्सूनपूर्व पूर्वतयारी आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये सावधगिरीच्या दृष्टीने कोणकोणती पूर्वतयारी गरजेची आहे. याबद्दल चर्चा झाली तसेच मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिले.

 

सध्याचे कोरोनाचे संकट अफाट आहे. त्यामुळे आम्ही बचाव कार्य करूच पण या परिस्थितीमध्ये आपण अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे म्हणून प्रयत्नशील राहण्यास मुख्यमंत्री यांनी सांगितले. त्याला अनुसरून आवश्यक असणारी संरक्षणात्मक उपकरणे, किट, मास्क उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यानुसार लवकरात लवकर कार्यवाही करण्यास सुरुवात केली जाईल असे त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.