मुंबई लोकल प्रवास 15 आॅगस्टपासून सुरू करणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, राज्यावर एकीकडे नैसर्गिक आपत्ती तर दुसरीकडे कोरोना संकट आहे. अशा संकटाला निर्भीडपणे तोंड देत या कोरोनाच्या दहशतीला कायमस्वरूपी मुळासकट हद्दपार केले पाहिजे. स्वातंत्र्य दिनाचा संघर्ष फक्त आठवायचा नाही, आता निश्चय करुया. असे सांगत मुंबई लोकल प्रवास 15 आॅगस्टपासून सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, १५ ऑगस्ट येत आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती, कोरोना संकट आणि दुसऱ्या बाजूला ऑलिम्पिक सुरु आहे. ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू प्रयत्नांची पराकष्ठा केली आहे. या स्वातंत्र दिनाच्या आठ दिवस आगोदरच आपण निश्चय केले पाहिजे कि हि कोरोनाची दहशत कायमची मिटवून टाकणार आहोत. गेल्यावर्षी चक्रीवादळ आले. याहीवर्षी आपल्या राज्यावर महापुराची संकट कोसळले. अशा परिस्थिती आपल्याला कायमस्वरूपी संकट बाजूला करायचे आहे.

मुंबईतील महत्वाच्या दृष्टीने असणारा लोकलचा विचार केला असून येत्या १५ ऑगस्टपासून आपण मुंबईकरांसाठी लोकल सुरु करणार आहोत. सर्वसामान्यांनी लसीचे दोन ढोस घेणे गरजेचे आहे. त्यासाठी एक एप तयार करण्यात आले असून त्यावर लसीचे दोन ढोस घेणे पंधरा दिवसापूर्वी घेणे गरजेचे आहे. त्या एपवर नोंदणी केल्यास त्यांना पासेस दिले जाणार आहे. त्यानंतर लसींचे दोन ढोस घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास करता येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह; मोठी घोषणा करण्याची शक्यता

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून त्याबाबत कार्यवाही केली जात आहे. नुकताच एक निर्णय आला कि आरक्षण देण्याचे अधिकार हे राज्य सरकारला आहे. मात्र, आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो कि, मराठा व ओबीसी आरक्षणाची ५० टक्केची आत शिथिल करावी. ती केल्यास आम्हाला आरक्षण देता येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Comment