आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय होण्यासाठी शासनाकडे लवकर प्रस्ताव पाठवावा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | शहरातील मिटमिटा येथे महापालिकेतर्फे प्राणिसंग्रहालयाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्राणिसंग्रहालयाच्या काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर यासाठी अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठवावा असे निर्देश देखील दिले आहेत.

महापालिका हद्दीतील मराठवाड्यातील एकमेव प्राणीसंग्रहालय असलेले 14 एकर जागेवरील सिद्धार्थ उद्यानात प्राण्यांसाठी जागा कमी पडत असल्यामुळे अनेक केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दाखवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी मिटमिटा येथे 40 हेक्टरवर प्राणीसंग्रालयाचे काम सुरू आहे. जर औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय तयार करायचे असेल तर त्यासाठी आणखी जागा आणि निधी दोन्ही लागणार आहे. याबाबत मंगळवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी वरील आदेश दिले आहे. यावेळी आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल महसूल विभागाचे अधिकारी तसेच औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांची उपस्थिती होती.

Leave a Comment