Thursday, March 30, 2023

योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याने आता चित्रपट गृह सुरु करण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबत अधिक चरचा करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध मंत्र्यांची सह्याद्री अतिथिगृहात महत्वाची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील चित्रपटगृहांनी योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सिनेमागृह आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत निर्णय झाला आहे. मात्र, 50 टक्के क्षमतेची अट शिथिल करावी याबाबत चर्चा करण्यात आली आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहाना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल.

- Advertisement -

सह्याद्री अतिथी गृहात पार पडलेल्या बैठकीपूर्वी सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह उपस्थित होते.