मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री जनतेला संबोधित करणार ; मोठा निर्णय घेण्याची शक्यता ?

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णय तसेच कोरोना व्हायरसच्या संकटाबाबत जनतेला संबोधित करणार आहेत.

आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एक निवेदन जाहीर केले आहे.

आता मुख्यमंत्री मराठा आरक्षण व कोरोना संकटाबाबत काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच उद्धव ठाकरे आज मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

You might also like