कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रिडांगणावर संपन्न झालेल्या खुल्या गटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि मुख्यमंत्री चषक 2023 स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, राष्ट्रीय खेळाडू आणि प्रो कबड्डी खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामुळे लिबर्टी मजदूर मंडळाच्या वतीने आणि आयोजक रणजीत पाटील (नाना) यांच्या वतीने सर्वांचा येथोचित सत्कार करण्यात आला आहे. दरम्यान “लिबर्टी”च्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारामुळे उपस्थित खेळाडू भारावलेले होते.
दरम्यान, खुल्या गटातील पुरुष व महिला गटातील प्रथम विजेत्या संघांना कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या हस्ते “मुख्यमंत्री चषक 2023” व गौरवपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव पाटील, उपाध्यक्ष अरुण जाधव, सचिव रमेश जाधव,अॅड. मानसिंगराव पाटील, मुनीरभाई बागवान सावकार, विजय गरुड, सचिन पाटील, काशिनाथ चौगुले, राजेंद्र जाधव, दादासाहेब पाटील, रणजीत पाटील, जितेंद्र जाधव, भास्कर पाटील, नंदकुमार बटाणे, बाळासाहेब मोहिते उपस्थित होते.
शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त विकास काळे, लता पांचाळ, राष्ट्रीय खेळाडू मनोज बोंद्रे, राष्ट्रीय खेळाडू प्रो खेळाडू बेंगलोर वॉरियर सुनील दुबिले, राष्ट्रीय खेळाडू प्रो कबड्डी पुणेरी पलटण अक्षय जाधव, राष्ट्रीय खेळाडू मुंबईचे किरण मगर, ऑल इंडिया युनिव्हर्सिटीचे खेळाडू राम अडगळे, अक्षय सूर्यवंशी, सिनियर नॅशनल खेळाडू स्वप्नील भादवणकर, युनिव्हर्सिटी मुंबईचे खेळाडू प्रफुल कदम, पहिली खेलो इंडियाचे खेळाडू सिद्धेश पाटील, मुंबई युनिव्हर्सिटीचे खेळाडू साहिल राणे, मुंबई शहर सुवर्णपदक विजेते शार्दुल पाटील, राष्ट्रीय खेळाडू अंकिता जगताप, सलोनी गजमल, मंदिरा कोनकर, राष्ट्रीय खेळाडू पौर्णिमा जेधे, नॅशनल गेम्स रौप्यपदक विजेते रक्षा नारकर, राष्ट्रीय खेळाडू प्राची भादवतकर, सिद्धी चाळके, समरीन बुरुंडकर, तस्मिन बुरुंडकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक राजेश पाडवे यांच्यासह सर्व प्रमुख खेळाडू व प्रमुख पंच, प्रशिक्षकांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रात प्रथमच राष्ट्रीय खेळाडू एका क्रीडांगणावर जमण्याचा हा प्रथम प्रसंग होता. कराड सारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडू उपस्थित राहिले होते. तसेच लिबर्टी मजदूर मंडळ व रणजित पाटील (नाना) यांच्यावतीने खेळाडूंचा सत्कार करण्यात आल्यामुळे सर्व खेळाडू भारावले होते. अनेकांनी सदगतीत होऊन आपल्या भावनाही व्यक्त केल्या. आमचा सत्कार म्हणजे कामाची पोचपावती असलेली भावनाही व्यक्त केली आहे.