मुख्याधिकाऱ्यांचा दणका : वेण्णा नदीपात्रात बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे दिले आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर प्रतिनिधी । वेण्णालेक जवळच वेण्णा नदीपात्रात अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम करीत असलेल्या एका धनिकास पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी चांगलाच दणका दिला आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाने इमारतीमध्ये असलेले बांधकाम साहित्य व औजारे जप्त करून बेकादेशीर बांधकाम न करण्याचे सक्त आदेश पाटील यांनी दिले आहेत. मुख्याधिकाऱ्यांच्या या भुमिकेमुळे वेण्णानदी पात्रात विनापरवाना बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, वेण्णालेक येथे वेण्णा नदीचा उगम आहे. येथुन ही नदी पुढे जावली तालुक्यात प्रवेश करते. नदीचा उगम असल्याने प्रारंभी या नदीचे पात्र छोटे आहे पुढे पुढे हे पात्र मोठे होत गेले आहे. गेली दहा वर्षांत पालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे या भागात विनापरवाना बांधकामांना चांगलाच उत आला आहे.

अलिकडे अशा प्रकारे वेण्णानदी पात्रात अतिक्रमण करून विनापरवाना बांधकामे वाढली आहेत. यापैकी काही महाभागांनी नदीपात्र वळवुन इमारती बांधल्या आहेत. महाबळेश्वरला कितीही प्रचंड पाऊस झाला तरी या भागात मोठया प्रमाणावर पाणी साचत नाही. परंतु यंदा मात्र डोंगरावर पाणी साचण्याचा विक्रम मोडण्यात आला. लिंगमळा भागात मोठया प्रमाणावर पाणी साचले हे पाणी काही नागरीकांच्या घरात घुसल्याने मोठी हानी झाली. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

वेण्णालेक जवळच एका धनिकाने नदीपात्रात अतिक्रमण करून विनापरवाना बांधकाम सुरू केले आहे. पालिकेने वेळो वेळी विनापरवाना बांधकाम करीत असलेल्या मिळकत धारकास नोटीसा बजावल्या आहेत परंतु पालिकेच्या नोटीसांना केराची टोपली देवुन राजकिय वरदहस्ताच्या आधारे या धनिकाने एक एक मजला करीत इतारतीचे बांधकाम सुरू ठेवले आहे. नोटीसाला हा धनिक किंमत देत नाही हे पाहुण पालिकेने या मिळकत धारकांवर दोन वेळा गुन्हे दाखल केले आहेत.

Leave a Comment