Chikhaldara Paramotoring Service : चिखलदऱ्यात पॅरामोटरिंग सेवा सुरु; 3000 फुटावरून अनुभवा निसर्गाचे सौंदर्य

Chikhaldara Paramotoring Service
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Chikhaldara Paramotoring Service। विदर्भाचे नंदनवन असणाऱ्या मेळघाटमधील चिखलदरा येथे पावसाळ्यात अनेक पर्यटक मोठी गर्दीय करतात. हिरवेगार जंगल, खोल दऱ्या, उंच उंच पहाड आणि त्यातच बरसणारा पाऊस… अशा या चिखलदऱ्याचे नयनरम्य विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात. आता या पर्यटकांना पॅरामोटरिंग चा अनुभव घेता येणार आहे. या माध्यमातून तब्बल ३००० फूट उंचीवरून निसर्गाचे सौंदर्य अनुभवता येणार आहे.

तस बघितलं तर साहसी खेळांची आवड असलेले बरेच पर्यटक चिखलदरा येथे येतात. पॅरामोटरिंगमुळे (Chikhaldara Paramotoring Service) या पर्यटकांना पर्यटक भीमकुंड, गाविलगड किल्ला, स्कायवॉक पॉइंट, चिखलदरा शहर आणि आकाशातून येथील जंगलातील खोल दरीचा आनंद घेता येणार आहे. वन विभागाच्या सहकार्यानं चिखलदरा येथे पर्यटकांना भुरळ पडणाऱ्या पॅरामोटरिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. ही सेवा प्रशिक्षित पायलट्सच्या देखरेखीखाली चालवली जाते, जे सुरक्षितता सुनिश्चित करतात. उपकरणे आणि प्रशिक्षण उच्च दर्जाचे असून, नवशिक्यांसाठीही ही सेवा सुरक्षित आहे. साधारणपणे एक पॅरामोटरिंग फ्लाइट 15 ते 30 मिनिटांची असते, ज्यामध्ये पर्यटकांना मेळघाटच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येतो. पॅरामोटरिंगचा खर्च साधारणपणे प्रति व्यक्ती 2,000 ते 3,500 रुपये असू शकतो, परंतु नेमके दर जाणून घेण्यासाठी स्थानिक वनविभागाशी किंवा सेवा प्रदात्याशी संपर्क साधावा लागेल.

दरम्यान, पॅरामोटरिंगचे पायलट आशिष तोमर यांनी पॅरामोटरिंग पायलट म्हणून दोन वर्षांचे प्रशिक्षण घेतले. उल्लेखनीय म्हणजे, त्यांना पाँडिचेरी, जैसलमेर, हरिद्वार, अलिबाग आणि गोवा येथे पॅरामोटरिंग पायलट म्हणून चार वर्षांचा अनुभव आहे. आशिष तोमर हे मूळचे परतावाडा येथील रहिवासी असून त्यांनी मुंबईत चित्रपटसृष्टीत स्टील फोटोग्राफर म्हणून सुद्धा काम केलंय. नो एन्ट्री, प्रेमाची गोष्ट अशा काही चित्रपटांसाठी स्टील फोटोग्राफी त्यांनी केलीय. Chikhaldara Paramotoring Service

चिखलदराला कस पोहचाल ? Chikhaldara Paramotoring Service

चिखलदरा हे अमरावतीपासून 100 किमी अंतरावर आहे. नागपूर ते चिखलदरा 231 किमी अंतर आहे. तर मुंबईवरून ६०० किलोमीटर अंतरावर आहे. विमानाने जायचं असल्यास तुम्हाला अमरावती विमानतळ गाठावे लागेल. हे विमानतळ चिखलदऱ्यापासून 107 किमी अंतरावर आहे. तर रेल्वेने जायचं असल्यास अमरावती किंवा बडनेरा रेल्वे स्टेशनला उतरावं लागेल. तेथून तुम्ही बस, टॅक्सी किंवा खासगी वाहनाने चिखलदऱ्याला जाऊ शकता.