आईच्या मदतीने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
स्वतःच्या ६ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करण्यास आरोपीला मदत करणाऱ्या निर्दयी मातेला आणि तिच्या मित्राला जिल्हा व सत्र न्यायाधीश ध्रीमती साधना शिंदे यांनी शिक्षा सुनावली. आरोपी इरफान शरिकमसलत याला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम-८ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड आणि त्याला मदत करणारी माता सुजाता जाधव हिला ३ वर्षे साधी शिक्षा व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
 सदरची घटना सुजाता जाधव हिच्या घरी १० जुन २०१८ रोजी संध्याकाळी घडली होती. यातील आरोपी हि पीडित मुलीची आई आहे. ती ६ वी मध्ये जयसिंगपूर येथील आश्रमशाळेत शिकण्यास आहे. ती शाळेला उन्हाळी सुट्टी लागल्याने घरी आली होती. इरफान हा मुलीच्या घरी नेहमी ये-जा करीत होता. ती मुलगी त्याला मामा म्हणत होती. १० जून २०१८ रोजी इरफान हा तिच्या घरी गेला होता. ती मुलगी सिलेंडर जवळ बसली होती. तिच्याशेजारी तिची आई बसली होती. इरफान हा दाराजवळ बसला होता. त्याने पीडितेला जवळ ओढले. तिला लज्जा उत्पन्न असे वर्तन केले. मुलगी घाबरली. ती मागे सरकत असताना तिची आईने तिला त्याच्या अंगावर ढकलून दिले. त्या मुलीने आरडाओरडा केल्याने इरफान पळून गेला.
हि घटना त्या मुलीने शेजारी राहणाऱ्या महिलेला सांगितली. ती महिला मुलीला घेऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात आली. त्या मुलीची आई आणि इरफान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड यांनी केला होता. त्यांनी पंचनामा करून पीडित मुलगी व साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सर्व आरोपींच्याविरोधात भक्कम पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानुसार आरोपीना आज शिक्षा सुनावण्यात आली.

Leave a Comment